Join us  

हरितालिकेच्या उपवासाला काय करावे- काय करू नये? लक्षात ठेवा ५ नियम, थकवाही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 11:24 AM

Hartalika Teej Vrat Fasting Rules : मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

हरितालिकेचा (Hartalika Teej) सण  खास मानला जातो. या दिवशी अनेक मुली, महिला श्रद्धेने उपवास करतात. गणपतीच्या आदल्या दिवशी असणारा हरितालिकेचा सण महिलांसाठी खूप खास असतो. इच्छित वर  प्राप्त होण्यासाठी मुली हे व्रत करतात. विवाहित महिलाही हा उपवास करतात. अनेकदा कामाच्या गडबडीत उपवास केल्यास थकवा येतो (Hartalika Teej Vrat Food Rules To Follow While Fasting) आणि शारीरिक ताण जाणवतो. थकवा, अशक्तपणा अशी लक्षणं दिसून येतात. उपवास करतानाही काही गोष्टींची काळजी घेतली तर थकवा जाणवणार नाही. (Hartalika Fasting Rules) या उपवासाला काय खायचं काय खाऊ नये याचे सोपे नियम समजून घेतले तर उपवासाचा त्रास अजिबात जाणवणार नाही. 

१) अनेक महिला पाणी न पिता हा उपवास करतात तर काहीजणी फक्त दूध आणि फळांचे सेवन करतात. तुम्हाला अशा प्रकारच्या उपवासांचा ताण पडत असेल तर उपवासाचे पदार्थ जसं की बटाटा, साबुदाणा या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

२) चोविस तासांचा फळं खाऊन उपवास केला असेल तर उपवास सोडताना आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे अशक्तपणा येणं टाळता येऊ शकतं. उपवास  सोडताना ताक, दही अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. 

३) या उपवासाच्या दिवशी सफरचंद, डाळिंब, अननस, केळी या पदार्थांचे सेवन करू शकता.  जास्तीत जास्त पेय पदार्थांचा आहारात समावेश करा. नारळपाणी, लिंबूपाणी, हंगमी रस, डाळिंबाचा रस, मिल्कशेक या पदार्थांचा आहारात समावेश करा. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, आणि मनुके यांसारख्या ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता. तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानं आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यामुळे डोकेदुखी, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवतात.

४) उपवासाच्या दिवशी चिडचिड, राग करणं टाळा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शांत राहा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या. 

५) मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका, कोणाबद्दलही मनात द्वेषाची भावना ठेवू नका. सर्वांची प्रेमाने व्यवहार करा. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया