सणावाराला आपण पुरीचा बेत हमखास आखतो. पुरी भाजी, पुरी श्रीखंड, किंवा नुसती पुरी खायला देखील भन्नाट लागते (Social Viral). प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पुऱ्या करतो (Trolled). गोल-टम्म फुगलेली पुरी आपण खाल्लीच असेल. गव्हाचे पीठ भिजवून, त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून आपण तळतो. पण ही आपली कॉमन पद्धत झाली. जी वर्षानुवर्षे आपण फॉलो करत आलो आहोत. पण सध्या सोशल मिडीयावर पुरी बनवण्याची एक नवीन पद्धत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने पोळपाटावर नसून, चाळणीवर पुऱ्या लाटल्या आहेत.
शिवाय तळल्यानंतर पुऱ्यांवर छान डिझाईन देखील आली आहे. जे पाहून फिटनेस फ्रिक वर्गाला देखील पुऱ्या खाण्याचा मोह आवरणार नाही. पुऱ्या तयार करण्याची ही पद्धत नेमकी कोणती? या पुऱ्यांमध्ये विशिष्ट वैशिष्ट्य काय? पाहूयात(Have you ever eaten Dotted Poori? See the amazing trick; Internet Users Trolled Poori).
अरे बापरे! एका जोडप्याला स्वित्झर्लंड वारी पडली महागात! फोनचे बिल कोटींच्या घरात, पुढे जे झालं...
व्हायरल पुरी एकदा करून पाहाच
व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने पोळपाटाचा वापर न करता, चाळणीवर पुऱ्या लाटल्या आहेत. त्यांनी चाळणीच्या उलट्या बाजूवर कणकेचा गोळा ठेवला. सपाट चाळणीवर त्यांनी लाटण्याने अलगद पुरी लाटली. पुरी लाटल्यावर खाली असलेल्या छिद्रात दाण्यांसारखे अनेक ठिपके बाहेर येतील.
आता एका बाऊलमध्ये बीटरूट किसून घ्या. त्याचा रस काढा. आता पुरीच्या छिद्रांवर बीटरूटचा रंग लावा आणि जेव्हा सर्व ठिपके रंगतील, तेव्हा हलक्या हाताने पुरी उचलून गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे व्हायरल पुरी खाण्यासाठी रेडी. या पुरी दिसायला एकदम वेगळ्या दिसतात. त्यामुळे मुलांना व्हायरल पुऱ्या खूप आवडतील.
मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..
काहींनी केलं ट्रोल
व्हायरल व्हिडिओवर नेहमी मिश्र प्रतिसाद मिळतात. काहींना ही व्हायरल पुरी करण्याची पद्धत आवडली. तर, काहींनी ट्रोल केलं. एकाने 'मला ही पुरी बिलकुल नाही आवडली. कारण पुरीला पिंपल आले आहेत.' तर दुसरीने, 'मला असं वाटत आहे, पुरीला कोरोना झाला आहे.' तर काहींनी नव्या पद्धतीच्या पुऱ्यांना पसंती दर्शवली आहे.