Join us  

खाल्लंय का तुम्ही इडली आईस्क्रिम विथ चटणी आणि सांबार? बघा हा अतरंगी प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 1:00 PM

Social Viral: आईस्क्रिमचा हा अचाट प्रकार पाहून नेटकरींनी तर डोक्याला हात मारला आहे.. आईस्क्रिम आणि इडली (idli and ice cream combination) या दोन्ही पदार्थांचे फॅन असाल, तर हा व्हिडिओ एकदा बघाच..(viral video)

ठळक मुद्देआता रेसिपी वाचून इडली आईस्क्रिम खावं वाटलं तर घरीदेखील प्रयाेग करू शकता किंवा मग दिल्ली गाठून हे आईस्क्रिम चाखून बघा.. 

खाद्यपदार्थांमध्ये प्रयोगाच्या नावाखाली कोण काय करेल काही सांगता येत नाही. दोन वेगवेगळे गुणधर्म असणारे, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ एकत्र आणायचे आणि त्यापासून काहीतरी अजब- गजब पदार्थ तयार करायचा, याचं काही जणांना भारीच वेड.. यामध्ये सगळ्यात जास्त प्रयोग होतात ते आईस्क्रिम आणि मॅगीसोबत. आता पुन्हा असाच एक अतरंगी प्रयोग व्हायरल झाला आहे. या प्रयोगात तर इतकं विचित्र कॉम्बिनेशन करून आईस्क्रिम बनवलं आहे, की ते पाहणारा नक्कीच डोक्याला हात लावतो.. (weird food combination)

 

आईस्क्रिम आणि इडली हे दोन्ही पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पाहून भयंकर राग येऊ शकतो.. thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवर इडली आईस्क्रिम करण्याची रेसिपी शेअर करण्यात आली आहे. आधी हे आईस्क्रिम कसं तयार होतं ते पहा आणि ते पाहून खाण्याची इच्छा झालीच, तर सरळ दिल्ली गाठा. कारण दिल्लीच्या एका विक्रेत्यानेच इडली आईस्क्रिम हा भन्नाट प्रयोग शोधून काढला आहे..

 

कसं तयार केलं इडली आइस्क्रिम?- इडली आईस्क्रिम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी शेफने इडली आईस्क्रिमच्या कुलिंग पॅडवर ठेवली.आणि तिचे बारीक बारीक तुकडे केले.- त्यावर त्याने लाल चटणी, नारळाची चटणी आणि सांबार टाकले. - त्यावर व्हॅनिला आइस्क्रिमचा एक स्कूप टाकून हे सगळे मिश्रण पुन्हा व्यवस्थित एकजीव करून कुलिंग पॅडवर पसरवले. - त्यानंतर या आईस्क्रिमचे लहान लहान रोल बनविले आणि ते एका प्लेटमध्ये ठेवले.- त्यावर अर्धी इडली ठेवली, त्यावर नारळाची चटणी आणि थोडा सांबार टाकला आणि असे हे इडली आईस्क्रिम खवय्यांना सर्व्ह केले..- बघा आता रेसिपी वाचून इडली आईस्क्रिम खावं वाटलं तर घरीदेखील प्रयाेग करू शकता किंवा मग दिल्ली गाठून हे आईस्क्रिम चाखून बघा.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामअन्नदिल्ली