अगदी कॉईन पिझ्झापासून ते फुल साईज पिझ्झापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा (pizza recipe) आपण नेहमीच पाहतो. त्यातले अनेक प्रकार तर आपण चाखूनही पाहिले आहेत. पिझ्झा कापल्यानंतर त्याचे त्रिकोणी आकाराचे स्लाईसही आपल्या चांगल्या ओळखीचे. पण या सगळ्यांपेक्षा वेगळा पिझ्झा सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे. विशेष म्हणजे या पिझ्झाला कोणताही आकार नाही. कारण तो पिझ्झा चक्क एका कुल्हडमध्ये (new style of making pizza) ओतला आहे.. म्हणूनच तर कुल्हड पिझ्झा (Kulhad pizza) म्हणून तो व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर आणि विशेषत: इन्स्टाग्रामवर नेहमीच खाद्य पदार्थांचे वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात. यातले बरेचसे व्हिडिओ असे असतात की एकतर तो पदार्थ किंवा ती रेसिपी आपल्यासाठी पुर्णपणे वेगळी असते. किंवा मग दोन विरुद्ध प्रकारचे खाद्य पदार्थ एकत्र आणून त्यांच्यापासून एकदमच वेगळा पदार्थ (weird food combination) करण्यात येतो. बऱ्याचदा हे सगळे पदार्थ चवीला कसे लागत असतील, ते काही सांगता येत नाही. पण ते व्हिडिओ बघायला मात्र जाम मजा येते. असाच एक कुल्हड पिझ्झा व्हिडिओ सध्या pestolicious या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून पिझ्झाचा हा प्रकार अनेकांना आकर्षित करतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १६ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार हा पिझ्झा तुम्हाला खायचा असेल तर थेट दिल्ली गाठावी लागणार आहे. कारण दिल्लीतल्या कृष्णा नगर परिसरातील rabbitleecafe येथे हा पिझ्झा मिळतो. हा पिझ्झा बनविण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. सगळ्यात आधी तर त्या शेफने एक मोठा पॅन गॅसवर ठेवला. त्यावर बटर टाकून चिरलेला कांदा, सिमला मिरची, स्वीटकॉर्न टाकून परतून घेतले. नंतर अनेक वेगवेगळे प्रकारचे मसाले आणि सॉसेस टाकले. नंतर मेयोनीज अणि असंच काहीसे चिजी पदार्थ टाकले.
जुन्या स्लिपरला द्या नवा स्टायलिश लूक! जुन्यातून बनवा नव्या फॅशनेबल चपला, टाकाऊतून टिकाऊ!
हे सगळं मिश्रण एकत्र करून मातीच्या कुल्हडमध्ये भरलं. आणि तो कुल्हड मायक्रोवेव्हमध्ये बेक करायला ठेवला. काही मिनिटानंतर कुल्हड बाहेर काढल्यानंतर त्यात गरमागरम आणि अतिशय चिझी असा कुल्हड पिझ्झा तयार झालेला होता. खवय्यांनी चमच्याने तो पिझ्झा खाण्याचा आनंद घेतला. आहे की नाही एकदम हटके ही कुल्हड पिझ्झा रेसिपी... आवडली असेल तर दिल्ली गाठल्यानंतर त्याची टेस्ट घ्यायला विसरू नका.