Join us  

खाऊन बघितली का पिझ्झा पाणीपुरी? हटके पदार्थ आणि त्याची भन्नाट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 4:28 PM

Viral Video of Pizza Panipuri: खाद्यपदार्थांच्या बाबतीत सोशल मिडियावर कधी काय अचाट प्रयोग होतील, काही सांगता येत नाही. हा आजचा पदार्थही त्यातलाच... काय तर म्हणे पिझ्झा पाणीपुरी..

ठळक मुद्देया पदार्थाला पिझ्झा पाणीपुरी म्हणण्याऐवजी पुरी पिझ्झा म्हणावा, असंही काही नेटिझन्सनी कमेंटमध्ये सुचवलं आहे.

पिझ्झा, पाणीपुरी हे असे काही पदार्थ आहेत की ज्यांचं नाव घेतलं तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पिझ्झा आणि पाणीपुरी (pizza panipuri) हे दोन्ही पदार्थ खूप जास्त आवडतात, असेही अनेक लोक आहेत. पण म्हणून काही हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं, हे काही त्यांना आवडणारं नसतं. पण सध्या सोशल मिडियावर जो पदार्थ व्हायरल झाला आहे, तो असाच थोडासा हटके असून यात पाणीपुरीच्या पुरी आणि पिझ्झा या दोन्ही पदार्थांचं भन्नाट कॉम्बिनेशन (Weird food combination of pizza and panipuri) केलेलं आहे. पिझ्झा पाणीपुरी असं या नव्या पदार्थाचं नाव आहे. 

 

thebitsy_tales या इन्स्टाग्राम पेजवरून पिझ्झा पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुंबईच्या मीरा रोड परिसरात हा पदार्थ मिळतो, असं या व्हिडिओवरून लक्षात येतं.

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश

या व्हिडिओमध्ये जी रेसिपी दिसते, त्यावरून या पदार्थाला पिझ्झा पाणीपुरी म्हणण्याऐवजी पुरी पिझ्झा म्हणावा, असंही काही नेटिझन्सनी कमेंटमध्ये सुचवलं आहे. घरच्याघरी ट्राय करायला हा पदार्थ सोपा आहे. शिवाय कमी मेहनतीत होणारा आहे. त्यामुळे आधी ही रेसिपी बघा आणि आवडला तर घरी करून पहा.

 

कशी केली पिझ्झा पाणीपुरी?१. हा पदार्थ तयार करण्यासाठी शेफने सगळ्यात आधी एका कटोरीमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवल्या.

२. त्यानंतर पाणीपुरीमध्ये जे बटाटा आणि कांदा यांचं सारण असतं, ते प्रत्येक पुरीमध्ये भरलं. शिवाय त्यावर थोडी बारीक चिरलेली शिमला मिरचीही टाकली.

गायीम्हशीचे दूध प्यावे की अलमंड, सोया मिल्क? आरोग्यासाठी काय योग्य? बघा तज्ज्ञांचं नेमकं मत

३. नंतर प्रत्येक पुरीवर २ वेगवेगळ्या फ्लेवरचे मेयोनिज टाकलं.

४. सगळ्यात शेवटी चीझ किसून टाकलं आणि नंतर त्याला उष्णता देऊन ते वितळवून घेतलं. वितळलेल्या चीजवर पुन्हा मेयोनिज, ओरिगॅनो, चिलीफ्लेक्स टाकले आणि हा आगळा- वेगळा पदार्थ खवय्यांना खाण्यासाठी दिला.

५. बघा आता या रेसिपीवरून तुम्ही याला काय म्हणणार- पिझ्झा पाणीपुरी की पुरी पिझ्झा?

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न