Join us  

काळ्या गाजराचा हलवा पाहिलाय? 'काले गाजर का हलवा'ची नेटवर धूम; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 4:59 PM

हलवा खाण्यासाठी रस्त्यावर लांबच लांब रांगा, ‘हे तर सिमेंट’ म्हणत नेटीझन्सनी उडवली खिल्ली...

ठळक मुद्देतुम्ही ट्राय केलाय कधी काळा हलवा? पाहा व्हिडिओवाचा नेटीझन्सच्या एकाहून एक गमतीदार प्रतिक्रिया

थंडीचे दिवस म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारण्याचे दिवस. यातही गोड पदार्थ म्हणजे गाजराचा सिझन असल्याने सध्या अनेकांकडे गाजराच्या हलव्यावर (Gajar halwa) ताव मारला जात असेल. घरच्या घरी झटपट होणारे पक्वान्न म्हणजे अनेकांना जीव की प्राण. कडाक्याच्या थंडीत उत्तर भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे काळ्या गाजराचा हलवा. सोशल मीडियावर (Social Viral) या काळ्या गाजराच्या हलव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लखनऊमधील एका स्टॉलवर हा काळ्या गाजराचा हलवा विकला जात आहे. हा हलवा खाण्यासाठी लोक एकच गर्दी करत असून एक व्यक्ती हा हलवा पाहून तो अतिशय छान असल्याची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. 

इन्स्टाग्रामवर युट्यूब स्वाद ऑफीशियल या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर लोकांनी एकाहून एक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटीझन्सनी ‘हे काय, हे तर सिमेंट आहे’ असे म्हणत या हलव्याची खिल्ली उडवल्याचे दिसते. तर अनेक जण त्याची तारीफ करत आहेत. आपल्यापैकी अनेकांना या काळ्या गाजराच्या हलव्याविषयी कदाचित माहिती नसेल. त्यामुळे बरेच जण तो खाण्याची इच्छाही व्यक्त करत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ ७ दिवसांत १८ लाख जणांनी पाहिला असून ७६ हजार जणांनी त्याला लाइक केले आहे. सोशल मीडियावर काले गाजर का हलवाची चांगलीच चर्चा असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

काय असतात काळे गाजर खाण्याचे फायदे 

१. काळे गाजर हे लाल गाजरापेक्षा जास्त गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

२. यामध्ये फायबर, पोटॅशियम, विटॅमिन ए, विटॅमिन सी, मँगनीज, विटॅमिन बी यांसारखे पोषक घटक असतात. 

३. इम्युनिटी बूस्टर म्हणून काळे गाजर खाण्याचे फायदे असतात. यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने सर्दी-खोकला सारख्या संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी हे गाजर खाणे उपयुक्त ठरते. 

४. यातील एंथोसायनिन हा घटक दाह कमी करणारा असल्याचे त्याचा शरीराला फायदा होतो. 

५. या गाजरात असणारे अँटीऑक्सिडंटस आपल्याला कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामअन्न