सणवार म्हटलं की आपण घराची साफसफाई व स्वच्छतेकडे अतिशय बारकाईने लक्ष देतो. सण असला की आपण महिनाभर आधीच घराची साफसफाई करतो. घरासोबतच आपण किचनची देखील तितकीच स्वच्छता ठेवतो. किचनची साफसफाई करताना आपण किचनमध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूची देखील स्वच्छता ठेवतो. कोणताही खास प्रसंग किंवा सण आला की आपण ठेवणीतली खास भांडी माळ्यावरून काढतो. या भांड्यांमध्ये काही काचेचे भांडी देखील असतात. काचेची भांडी ही खूपच नाजूक पद्धतीने हाताळावी लागतात म्हणून आपण ती रोजच्या वापरासाठी वापरत नाही. अशी भांडी दिवसेंदिवस तशीच पडून राहिल्याने खराब होतात किंवा त्यांवर डाग पडतात. (5 Easy Cleaning Tips For Glass Utensils).
काचेची भांडी आपण शक्यतो घरात काही खास कार्यक्रम, सण असेल तेव्हाच काढतो. अशावेळी ही भांडी बऱ्याच काळानंतर वापरात काढल्यामुळे खराब दिसतात. त्यामुळे ही काचेची भांडी (5 Tips for Keeping Your Glass Sparkling Clean) वापरायला काढल्यानंतर दिसायला जुनी (5 Easy home remedies to keep clean glassware at home) दिसून नये. तसेच त्यावरची धूळ व डाग नाहीसे होऊन ही भांडी लख्ख दिसावीत(Having Trouble For Cleaning glass utensils ? Try These 5 Tips For Spotless Results) असे आपल्याला वाटत असते. त्यामुळे ही काचेची भांडी स्वच्छ कशी करावीत यासाठी काही सोप्या टिप्सचा वापर करु(Follow these 5 easy home remedies to clean glass utensils).
काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स...
१. अॅक्टिव्हेटेड ब्लिच :- अॅक्टिव्हेटेड ब्लिचचा वापर करून आपण घरातील काचेची भांडी झटपट स्वच्छ करु शकतो. आपण चेहेऱ्याचे फेशियल करण्यासाठी जे ब्लिच वापरतो, त्या ब्लिचसोबत जे अॅक्टिव्हेटेड ब्लिच येते त्याचा वापर करून भांडी स्वच्छ करु शकतो. यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन मग त्यात १ ते २ टेबलस्पून अॅक्टिव्हेटेड ब्लिच घालावे. या पाण्यांत काचेची भांडी पूर्णपणे बुडतील अशी ठेवून द्यावी. १ तासानंतर ही भांडी पाण्यांतून काढून पुन्हा डिशवॉश लिक्विडने स्वच्छ धुवून घ्यावी.
किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...
२. बेकिंग पावडर :- काचेची भांडी चमकवण्यासाठी बेकिंग पावडर पाण्यात घालून ठेवा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नंतर काचेच्या भांड्यावर लावा आणि मग भांडी स्वच्छ करा. असे केल्याने जुन्या काचेच्या भांड्यावर आलेले डाग गायब होतील.
मिक्सर ग्राईंडरच्या खालचा भाग स्वच्छ करणे कठीण काम? १ सोपी ट्रिक, मिक्सर ग्राईंडर दिसेल नव्यासारखे..
३. लिंबाची साल :- पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा. हा उपाय केल्याने काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील. यावरील जुनाटपणा निघून जाईल.
४. गरम पाणी व लिक्विड डिशवॉश :- लहान तोंडाचे काचेचे ग्लास किंवा फ्लॉवरपॉटवरील डाग घालविण्यासाठी गरम पाण्यात लिक्विड डिशवॉश घाला आणि त्यात अमोनिआचे काही थेंब मिसळून ही भांडी स्वच्छ करा. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणून आपण गरम पाण्यात मीठ घालून वरून व्हिनेगर घाला आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्या. काही वेळानंतर या मिश्रणाने काचेची भांडी साफ करा. यामुळे काचेही भांडी पूर्वीसारखी चमकदार दिसतील. यावरील सर्व काळेपणा आणि धूळ निघून जाण्यास व्हिनेगर आणि मीठाच्या पाण्यामुळे मदत होते.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
५. व्हिनेगरचा वापर :- काचेची भांडी स्वच्छ केल्यानंतर काही काळ व्हिनेगर मिसळलेल्या पाण्यात बुडवून ठेवावी. काही वेळाने बाहेर काढून न धुताच भांडी सुकवावी. यामुळे काचेच्या भांड्यांची चमक टिकून राहते.
कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...