Lokmat Sakhi >Social Viral > सौदी अरेबियात स्लीपरची किंमत काही लाखांत! व्हायरल व्हिडिओ, चपलेने खाल्लेला मार अनेकांना आठवला कारण..

सौदी अरेबियात स्लीपरची किंमत काही लाखांत! व्हायरल व्हिडिओ, चपलेने खाल्लेला मार अनेकांना आठवला कारण..

Hawai Chappal sold for 1 lakh in Saudi Arabia, netizens react : लाखात विकल्या जाणाऱ्या स्लीपरची अशी काय खास खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 03:44 PM2024-07-18T15:44:50+5:302024-07-18T15:50:44+5:30

Hawai Chappal sold for 1 lakh in Saudi Arabia, netizens react : लाखात विकल्या जाणाऱ्या स्लीपरची अशी काय खास खासियत?

Hawai Chappal sold for 1 lakh in Saudi Arabia, netizens react | सौदी अरेबियात स्लीपरची किंमत काही लाखांत! व्हायरल व्हिडिओ, चपलेने खाल्लेला मार अनेकांना आठवला कारण..

सौदी अरेबियात स्लीपरची किंमत काही लाखांत! व्हायरल व्हिडिओ, चपलेने खाल्लेला मार अनेकांना आठवला कारण..

आपल्यापैकी अनेकांनी निळ्या पांढऱ्या रंगाची रबराची स्लीपर वापरली असेल (Social Viral). काहींनी तिच्याने मारही खाल्ला असेल. आजही अनेक जण ही स्लीपर वापरतात (Saudi Arabia). आपण ही स्लीपर जवळपास बाजारात जाताना किंवा टॉयलेटला जाण्यासाठी वापरली असेल. ही स्लीपर आपल्या भारतात १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत ही स्लीपर मिळते.

पण ही स्लीपर आपण लाखात खरेदी कराल का? तुम्ही म्हणाल लाखात ती पण स्लीपर कोण खरेदी करेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सध्या अशीच एक स्लीपर चर्चेत आहे. या स्लीपरची किंमत समजल्यावर तुमच्याप्रमाणेच अनेकांना धक्काच बसला आहे. सौदी अरेबियातल्या महागड्या स्लीपरचा एक  व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे(Hawai Chappal sold for 1 lakh in Saudi Arabia, netizens react).

रवा-बेसनाचा करा इन्स्टंट ढोकळा, फक्त १५ मिनिटांत स्पॉन्जी ढोकळा रेडी, शाळेच्या डब्यासाठी मस्त खाऊ

स्लीपरला लाखात मागणी

सौदी अरेबियातील एका दुकानात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची चप्पल, ४,५०० रियालमध्ये विकली जात आहे. या स्लीपरला ट्रेण्डी सॅण्डल असे नाव देण्यात आले आहे. भारतीय रुपयांत ही किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या चप्पलच्या किमतीनेलोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन जोक सुरु झाले. कुणाला त्या स्लीपरने आईने आपल्याला चांगले बदडल्याचेही आठवले तर कुणाला गरीबीचे दिवस की तळ घासला जाईपर्यंत ही स्वस्त चप्पल आम्ही वापरत असू.

हाडं कमजोर- नजर धूसर झाली? व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे, शरीर देते ४ संकेत

या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टोअरमधील एक कर्मचारी त्या स्लीपरची वैशिष्ट्ये आणि किंमत सांगताना दिसून येत आहे. त्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. विशेषत: भारतीयांनी या व्हिडीओवर अगदी हटके कमेंट्स केल्या आहेत.

एका युजरने  म्हंटले की म्हणजे आम्ही आयुष्यभर टॉयलेट जाण्यासाठी आम्ही लाखो रुपयांची चप्पल वापरली. तर दुसरे कुणी म्हणाले की मारलेले वळ पुन्हा जागे झाले.

Web Title: Hawai Chappal sold for 1 lakh in Saudi Arabia, netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.