Join us  

‘तो’ चक्क दुकानात पुतळा बनून उभा राहिला, दुकानच लुटून घेऊन गेला, पाहा चोराचं भन्नाट डोकं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 2:29 PM

Viral Story Of Robbing in Poland: चोरी करण्याची ही भन्नाट युक्ती एखाद्या चित्रपटाच्या कथानकामध्ये शोभणारी आहे...

ठळक मुद्देआता तो पोलिसांच्या तावडीत आहे, पण त्याने चोरी करण्यासाठी जी युक्ती शोधून काढली, त्याची चर्चा मात्र जगभर सुरू आहे. 

चोरी कशा स्मार्ट पद्धतीने करावी, याविषयीचे अनेक चित्रपट आले आणि ते गाजलेही... आपल्याकडचे आँखे आणि धूम सिरिजचे चित्रपटही चोरीच्या कथानकावर आधारित होते. त्यामध्ये चोरी करण्यासाठी जे काही प्लॅन आखण्यात आलेले होते, ते पाहून आपण प्रत्येक क्षणी आवाक् होतो. शेवटपर्यंत अगदी मन एकाग्र करून चित्रपट पाहतो. आता अशीच एखाद्या चित्रपटात शोभावी अशी चोरी करण्याची शक्कल एका पोलंडमधल्या चोराने शोधून काढली. म्हणूनच त्याचा तो चाेरीचा प्रकार आणि चोरीचा भन्नाट किस्सा आता जगभर व्हायरल होत आहे. (robber has been arrested after he pretended to be a mannequin in a store)

 

तर ही गोष्ट आहे पोलंडमधली. तिथल्या मॉलमधल्या एका मोठ्या शोरूममध्ये हा प्रकार नुकताच काही दिवसांपुर्वी घडून आला. त्यात झालं असं की एक २२ वर्षीय चोरटा त्या मॉलमधे शिरला.

चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर...

त्यानंतर त्याला जिथे चोरी करायची होती, त्या शोरूममध्ये गेला आणि शोरूममध्ये डिस्प्लेसाठी जे पुतळे लावलेले असतात, त्या पुतळ्यांच्या शेजारी जाऊन पुतळा बनूनच उभा राहिला. त्याने हातात एक बॅगही धरली होती. कित्येक तासापासून तो तसाच स्तब्धपणे त्या जागी उभा होता. पण आश्चर्य म्हणजे ही गोष्ट त्या मॉलमध्ये येणाऱ्या एकाही ग्राहकाच्या तसेच शॉपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याच कामगाराच्या लक्षात आली नाही. त्यांनी शोरूमची वेळ संपल्यावर सगळी आवरासावरी केली आणि ते दुकान बंद करून निघून गेले.

 

त्यानंतर हा पुतळा बनून उभा राहिलेला चोर ॲक्टीव्ह झाला आणि त्याने त्याला पाहिजे होता, तो दुकानातला सगळा ऐवज लुटून नेला. त्यानंतर तो त्याच मॉलमधल्या एका दागिन्यांच्या दुकानात गेला आणि तिथूनही दागिने चोरले.

हॅण्डलूम टिश्यू साडीवर सोन्याची जर! बघा मनीष मल्होत्राने जान्हवी कपूरसाठी डिझाईन केलेली सुंदर साडी

नंतर फूड स्टॉलवर जाऊन त्याने काहीतरी खाल्लं. नंतर तो असंच चोरीच्या उद्देशाने जेव्हा बंद माॅलमध्ये फिरत होता, तेव्हा तो एका सुरक्षा रक्षकाच्या नजरेत आला आणि मग त्याचं चोरीचं बिंग फुटलं गेलं. आता तो पोलिसांच्या तावडीत आहे, पण त्याने चोरी करण्यासाठी जी युक्ती शोधून काढली, त्याची चर्चा मात्र जगभर सुरू आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलचोरी