Lokmat Sakhi >Social Viral > पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी.... 

पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी.... 

Health Tips Regarding Use Of Public Toilet: पब्लिक टॉयलेट वापरताना काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. त्यापैकीच ही एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 09:07 AM2024-07-05T09:07:25+5:302024-07-05T09:10:02+5:30

Health Tips Regarding Use Of Public Toilet: पब्लिक टॉयलेट वापरताना काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. त्यापैकीच ही एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा..

health expert says never use hot air hand dryer from public toilet, side effects of using hand dryer of public toilet | पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी.... 

पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी.... 

Highlightsएका अभ्यासानुसार असं आढळून आलं आहे की पब्लिक टॉयलेटमधल्या एका गोष्टीचा वापर करणं बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण ठरू शकतं. ती वस्तू नेमकी कोणती ते पाहा...

हल्ली प्रवास, ऑफिस, किंवा काही कामानिमित्त बाहेर फिरणे यामुळे पब्लिक टॉयलेटचा वापर करावाच लागतो. बऱ्याचदा आपण तो टाळण्याचा प्रयत्न करतो. पण नेहमीच ते शक्य होत नाही. त्या ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा काही झाल्याचे आपण ऐकतो. त्यामुळे पब्लिक टॉयलेटमध्ये गेल्यावर स्वत:च्या स्वच्छतेबाबत थोडी खबरदारी घेणं गरजेचंच आहे. त्यातच एका अभ्यासानुसार असं आढळून आलं आहे की पब्लिक टॉयलेटमधल्या एका गोष्टीचा वापर करणं बॅक्टेरियल इन्फेक्शनचं कारण ठरू शकतं. ती वस्तू नेमकी कोणती ते पाहा...(health expert says never use hot air hand dryer from public toilet)

 

हल्ली आपण पाहतो की मॉल, हॉटेल्स, विमानतळ, रेल्वेस्टेशन अशा ठिकाणच्या पब्लिक टॉयलेटमध्ये हात सुकविण्यासाठी हॉट एअर हॅण्ड ड्रायर बसविलेले असतात. पब्लिक टॉयलेट वापरल्यानंतर बहुसंख्य लोक त्याचा वापर करतातच.

गुलाबाच्या रोपावर बुरशी पडली, पानांवर बारीक छिद्रं दिसू लागली? ५ उपाय करा, गुलाब पुन्हा बहरेल 

पण हेच ड्रायर बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरविण्यासाठी कारणीभूत ठरतात, असं नुकतंच एका अभ्यासातून समोर आलं आहे. न्यूज एटीन यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१८ साली हार्वर्ड हेल्थ यांनी हँड ड्रायर संदर्भात एक अभ्यास केला होता.  त्यातून असं निदर्शनास आलं आहे की हॅण्ड ड्रायर हवेतले अनेक बॅक्टेरिया त्याच्यात ओढून घेतं.

 

जेव्हा आपण हात वाळविण्यासाठी त्याच्यासमोर ठेवताे, तेव्हा त्यातून बाहेर पडणाऱ्या हवेतून ते बॅक्टेरिया आपल्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर येऊ शकतात.

अनंत अंबानी आणि राधिकाच्या ‘मामेरू’ साेहळ्याची सगळीकडेच चर्चा! हा पारंपरिक सोहळा नेमका काय असतो?

त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता असते. अशाच पद्धतीचा अभ्यास अमेरिकेच्या कनेक्टिकट आणि क्विनिपियाक विद्यापीठातील अभ्यासकांनीही केला होता. त्यांच्या अभ्यासातून निघालेले बरेच निष्कर्ष सारखेच आहेत. त्यामुळे पब्लिक टॉयलेट आणि तिथले हॅण्ड ड्रायर वापरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असं ते अभ्यासक सांगतात. 

 

Web Title: health expert says never use hot air hand dryer from public toilet, side effects of using hand dryer of public toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.