Lokmat Sakhi >Social Viral > हिना खानच्या सिक्वन्स साडीची जबरदस्त व्हायरल चर्चा, कशी ही साडी? काय तिची खासियत?

हिना खानच्या सिक्वन्स साडीची जबरदस्त व्हायरल चर्चा, कशी ही साडी? काय तिची खासियत?

तुमच्याकडे आहे का सिक्वन्स साडी? हिना खानची Sequins Saree सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे... सिक्वन्स साडी म्हणजे नेमकं आहे तरी काय बरं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 05:37 PM2021-08-26T17:37:14+5:302021-08-26T17:46:44+5:30

तुमच्याकडे आहे का सिक्वन्स साडी? हिना खानची Sequins Saree सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे... सिक्वन्स साडी म्हणजे नेमकं आहे तरी काय बरं....

Heena Khan's sequins saree saree is tremendously viral, how is this saree? What is the specialty? | हिना खानच्या सिक्वन्स साडीची जबरदस्त व्हायरल चर्चा, कशी ही साडी? काय तिची खासियत?

हिना खानच्या सिक्वन्स साडीची जबरदस्त व्हायरल चर्चा, कशी ही साडी? काय तिची खासियत?

Highlightsपार्टीवेअर असणारी ही साडी हमखास भाव खाऊन जाणारी ठरते आहे. ही साडी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली असून अगदी २ हजारांपासून ते लाखभर किमतीपर्यंत सिक्वन्स साडीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. 

आपल्या फॅशन स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असणारी छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री म्हणजे हिना खान. अक्षराची भूमिका साकारून जबरदस्त लोकप्रिय ठरलेली हिना तिची स्टाईल आणि फॅशन यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच हिनाने प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी  डिझाईन केलेली एक साडी नेसली आहे. सिक्वन्स साडी प्रकारच्या या साडीमध्ये हिना अतिशय सुंदर दिसत आहे. 

 

खरेतर शिफॉन प्रकारातल्या साड्या डिझाईन करणे ही मनिष मल्होत्रा यांची खासियत. पण यावेळी त्यांनी डिझाईन केलेली सिक्वन्स साडी सध्या महिला वर्गात चर्चेचा विषय ठरतो आहे. बिग बॉस कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेलेल्या हिनाने ही साडी नेसली होती. तेव्हा तिच्या लुकची आणि तिच्या साडीची खूपच चर्चा झाली. 

सिक्वन्स आर्टचा इतिहास
सिक्वन्स आर्ट ही मध्यपुर्व आणि भुमध्य देशांची खासियत आहे. सिक्का हा अरेबियन शब्द आणि शिक्क्यांसाठी असणारा कॉईन हा इंग्रजी शब्द यावरून सिक्वन्स या शब्दाची निर्मिती झाली आहे, असा अंदाज व्यक्त केला जातो. सिक्वन्स साडीमध्ये सिक्के म्हणजेच गोल गोल आकाराचे छोटे छोटे कॉईनसारखे असणारे शिक्के लावून साडी तयार केली जाते. शिफॉन किंवा रेशमी साड्यांवर हे शिक्के लावले जातात. हल्ली गोल आकारासोबत वेगवेगळ्या आकारांच्या शिक्क्यांचाही वापर केला जातो. 

 

खूप पुर्वी बुट, चपला, बॅग यांना सुशोभित करण्यासाठी सिक्वन्स आर्टचा उपयोग व्हायचा. कालांतराने त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि कपड्यांसाठीही ही कला वापरली जाऊ लागली. सिक्वन्स आर्ट ही प्रामुख्याने हस्तकलेमध्ये मोडणारी होती. पण आता काळानुसार यामध्येही बदल होत असून मशिनद्वारे ही कलाकुसर करता येते. इ.स.पूर्व २५०० च्या सुमारास सिंधू व्हॅलीमध्ये सोन्याचे शिक्के वापरून अतिशय नजाकतीने कलाकुसर केली जायची, असेही सांगितले जाते. 

 

हल्ली शिमर साड्यांवर सिक्वन्स वर्क करण्यात येते. मनिष मल्होत्रा आणि सब्यासाची मुखर्जी यांनी शिमर साड्यांवर सिक्वन्स वर्क करण्याचा ट्रेण्ड आणला आणि तो प्रचंड हिट ठरला. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रीदेखील उन्हाळ्यात समर ट्रेण्ड म्हणून सिक्वन्स वर्कच्या साड्या नेसताना दिसल्या. सिक्वन्स साडीची एक खासियत म्हणजे ही साडी भरजरी असली तरी अतिशय लाईटवेट असते. या साडीवर इतके वर्क केलेले असते की, त्यामुळे दागिणे आणि मेकअप यांच्यावर एक्स्ट्रा काम करण्याची गरज पडत नाही. म्हणूनच अतिशय न्यूड मेकअप आणि गळ्यात एकच चोकर घालून देखील हिना सिक्वन्स साडीमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसते आहे. 

 

पार्टीवेअर असणारी ही साडी हमखास भाव खाऊन जाणारी ठरते आहे. ही साडी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली असून अगदी २ हजारांपासून ते लाखभर किमतीपर्यंत सिक्वन्स साडीचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. 

 

Web Title: Heena Khan's sequins saree saree is tremendously viral, how is this saree? What is the specialty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.