आता जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर होतो. पारंपारिक चुलीच्या जागी गावाखेड्यात देखील एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर करण्यात येतो. याच्या मदतीने स्वयंपाक कमी वेळात झटपट तयार होतो. पण दुसरीकडे एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमुळे खर्च देखील वाढत चालला आहे. अनेक घरांमध्ये एक सिलेंडर नीट महिनाभरही नीट चालत नाही.
काही घरांमध्ये एका महिन्यात दोन सिलेंडरचा वापर होतो. पण अशावेळी खर्च तर होतोच, शिवाय महिनाभर एलपीजी गॅस टिकेल कसा? असा प्रश्न निर्माण होतो (Kitchen Hacks). जर आपल्याला एकाच सिलेंडर टाकीवर महिना काढायचं असेल तर, ५ उपाय करून पाहा. या ५ उपायांच्या मदतीने, आरामात एका सिलेंडरच्या टाकीत महिना निघेल. शिवाय पैश्यांची बचतही होईल(Here Are 5 Hacks To Make Your LPG Sustain For Months).
गॅसवर ओली भांडी ठेवू नका
भांडी ही धुवूनच वापरावी. कारण त्यावर अनेक कीटक फिरत असतात. पण गॅसवर कधीच ओली भांडी ठेवू नये. कारण हिटमुळे भांड्यातील पाणी तर आटते, पण या प्रक्रियेत खूप वेळ जातो. ज्यामुळे खूप गॅसही वाया जातो. अशा वेळी, स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी सूती कापडाने भांडी पुसून घ्यावीत. मगच गॅसवर ठेवून स्वयंपाक करावा. यामुळे गॅसची खूप बचत होते.
रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..
प्रेशर कुकरचा वापर करा
वेळ आणि गॅसची बचत व्हावी यासाठी बहुतांश लोकं प्रेशर कुकरचा वापर करतात. यामुळे गॅस आणि वेळेची बचत होते. शिवाय प्रेशर कुकरमध्ये पदार्थ लवकर शिजतो. जर, आपल्याही घरातील गॅसची टाकी लवकर संपत असेल तर, स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा. यात पदार्थ लवकर तयार होते.
भांड्यावर झाकण ठेवून अन्न शिजवा
भांडे झाकून अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यामुळे अन्नातील पोषक तत्व हवेत उडत नाही, शिवाय ते अन्नातच शिजते. अशा पद्धतीने भांडे झाकून अन्न शिजवल्याने गॅसचीही बचत होते.
झोपण्यापूर्वी दुध पिताय? नुसते दूध बाधू शकते, १ चिमूटभर गोष्ट घाला; वाढेल प्रतिकारशक्ती
बर्नर कायम स्वच्छ ठेवा
बर्नर स्वच्छ ठेवल्याने स्टोव्हची ज्योत तीक्ष्ण जळते. ज्यामुळे भांडी कमी वेळात गरम होते. अशावेळी गॅसचा वापर कमी होतो, आणि बचतही होते. पण जर बर्नरमध्ये घाण साचली असेल तर, तो व्यवस्थित जळत नाही आणि गॅस विनाकारण बाहेर पडत राहते.
स्वयंपाक करण्यापूर्वी पूर्व तयारी महत्वाची
एलपीजी सिलेंडर लवकर संपू नये असे वाटत असेल तर, स्मार्ट कुकिंग हॅक्सचा वापर करा. स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्व तयारी करून ठेवा. यामुळे गॅस अधिक वेळ जळणार नाही. शिवाय कमी गॅसमध्ये झटपट स्वयंपाक तयार होईल.