Join us  

घरच्याघरी होम क्लिनिंग स्प्रे बनवण्याची ही घ्या सोपी पद्धत, घर कायम दिसेल स्वच्छ आणि चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 5:40 PM

Here's an easy way to make a Home Cleaning spray at home घरातील प्रत्येक वस्तू साफ करण्यासाठी होममेड क्लिनिंग स्प्रे ठरेल प्रभावी..

महिन्यातून एकदा तरी आपल्याला घरातील साफसफाई करावी लागते. घरामध्ये लगेच धूळ, कचरा, कोळीने विणलेलं जालं जमा होते. या सगळ्या गोष्टींमुळे घर अस्वच्छ दिसू लागते. याकारणामुळे घरातील सदस्यांना विविध आजार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे वेळीच घर साफ करणे आवश्यक आहे. साफसफाई करताना फक्त पाणी आणि झाडू कामी येत नाही. यासाठी आपण विविध साफसफाईचे प्रोडक्ट्स देखील वापरतो.

हे प्रोडक्ट्स आपल्याला घरातील वस्तूंची सफाई करण्यासाठी मदत करतात. हे प्रोडक्ट्स केमिकलयुक्त असतात. त्यामुळे आपल्या नाजूक स्किनला हानी पोहचण्याची शक्यता अधिक असते. आपण घरगुती साहित्यांपासून स्प्रे बनवू शकता. या स्प्रेने आपण संपूर्ण घराची साफसफाई करू शकता.

होममेड क्लिनिंग स्प्रे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

पाणी

व्हिनेगर

ऑलिव ऑयल

डिश लिक्विड

सिटरस एसेंशियल ऑयल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप पाणी घ्या. त्यात व्हिनेगर, ऑलिव ऑयल, डिश लिक्विड, सिटरस एसेंशियल ऑयल टाका. व हे संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करा. हे मिश्रण आपण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेऊ शकता.

आपण या स्प्रेचा वापर घरातील प्रत्येक वस्तू साफ करण्यासाठी करू शकता. काचेपासून ते लाकडी वस्तूंपर्यंत आपण संपूर्ण घर या तयार लिक्विडपासून साफ करू शकता. इतर प्रोडक्ट्सपेक्षा हे घरगुती उपाय फायदेशीर ठरेल.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्स