तेलकट डाग हे हट्टी असतात. मग ते कपड्यांवर असो किंवा किचनच्या भिंतीवर (Cleaning Tips). काहीवेळा स्वयंपाक करण्याच्या घाईगडबडीमध्ये, आपण तेलकट हातानेच डबे घेतो, आणि ते अधिक चिकट होतात (Food Storage). चिकट डबे स्वच्छ करणं कठीण. बऱ्याचदा घासूनही डबे स्वच्छ होत नाही (Kitchen Tips). घासून - घासून डब्याचा चिकटपणा निघत नाही. शिवाय वारंवार घासून डब्याची चमक कमी होते.
जर आपल्याला मेहनत न घेता, कंटेनर, प्लास्टिकचे मोठे बॉक्स आणि बाटल्या स्वच्छ करायच्या असतील तर, ३ सोप्या ट्रिक्सचा वापर करून पाहा (Social Viral). या ट्रिक्सचा वापर केल्याने स्वयंपाकघरातील डबे काही मिनिटात स्वच्छ होतील. शिवाय किचनमधली इतरही कामं झटपट होतील(Here's How to Clean All Your Food Storage Containers).
स्वयंपाकघरातील डब्याचा चिकटपणा कसा घालवायचा?
बेकिंग सोडा
स्वयंपाकघरातील तेल आणि मसाल्यांचे डबे खूप घाण आणि चिकट असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याची मदत घ्या. यासाठी एक ते दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिसळा आणि कापूस किंवा ब्रशच्या मदतीने डब्यांवर लावा. १५ ते २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. नंतर ब्रश किंवा स्क्रबरने डबे स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्याने धुवून करा.
पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल
बोरॅक्स पावडर
बोरॅक्स पावडरचा वापर आपण डब्याचा चिकटपणा घालवण्यासाठी करू शकता. याच्या वापराने चिकटपणा तर निघतोच, शिवाय घाणेरडा वासही निघून जातो. यासाठी पाण्यात लिंबाची साल टाकून गरम करा. नंतर त्यात २ मोठे चमचे बोरॅक्स पावडर घालून मिक्स करा. तयार मिश्रण स्वयंपाकघरातील सर्व डब्यांवर लावा, आणि काही वेळ तसेच राहू द्या. नंतर स्क्रबरने घासून डबे क्लिन करा आणि पाण्याने धुवून घ्या.
सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..
कोमट पाणी आणि डिटर्जंट
तेलकट - चिकट डबे स्वच्छ करण्यासाठी आपण कोमट पाणी आणि डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात डिटर्जंट मिक्स करा. तयार मिश्रण डब्यांवर लावा. काही वेळानंतर स्क्रबरने डबे घासून पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे डब्यातील हट्टी डाग निघून जातील.