Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकघरात लाल मुंग्यांची रांग? १ टिप, लाल मुंग्यांचा त्रास होईल कमी कायमचा-पाहा उपाय

स्वयंपाकघरात लाल मुंग्यांची रांग? १ टिप, लाल मुंग्यांचा त्रास होईल कमी कायमचा-पाहा उपाय

Here's How to Get Rid of Ants Permanently in Your House : घरभर लाल मुंग्या फिरत असतील तर हे उपाय पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 05:40 PM2024-11-15T17:40:56+5:302024-11-15T17:41:50+5:30

Here's How to Get Rid of Ants Permanently in Your House : घरभर लाल मुंग्या फिरत असतील तर हे उपाय पाहा

Here's How to Get Rid of Ants Permanently in Your House | स्वयंपाकघरात लाल मुंग्यांची रांग? १ टिप, लाल मुंग्यांचा त्रास होईल कमी कायमचा-पाहा उपाय

स्वयंपाकघरात लाल मुंग्यांची रांग? १ टिप, लाल मुंग्यांचा त्रास होईल कमी कायमचा-पाहा उपाय

घरातील गुळ - साखरेच्या डब्याला अनेकदा हमखास लाल मुंग्या (Red ants) येतात. शिवाय किचनमध्येही कोणता पदार्थ खाली पडला असेल तर, त्याच्याभोवती लाल मुंग्या जमा होणं स्वाभाविक आहे. या लाल मुंग्या कधी कपड्यांवर चढतील तर कधी अंथरुणावर हे कळूनही येणार नाही (Cleaning Tips). लाल मुंग्यांची दहशत घराच्या कोणत्याही कोपऱ्यात दिसून येते (Social Viral). अनेकदा किचनमधील सिंकच्या आजाबाजूला, ओट्यावर या मुंग्यांची रांग लागलेली दिसते. काहीवेळी या मुंग्या अगदी बारीक असतात तर काहीवेळा मोठ्या लाल चावणाऱ्या मुंग्या असतात.

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण कीटकनाशके वापरतो. ज्यामुळे मुंग्यांपासून आपली सुटका होते. पण रासायनिक कीटकनाशकांमुळे आपल्याला आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय याचा वापर करूनही मुंग्या घरातून पळ काढत नाही. जर मुंग्यांना घरातून पळवून लावायचं असेल तर, ५ घरगुती उपायांची मदत घ्या. घरातून लाल मुंग्या नक्कीच पळ काढतील(Here's How to Get Rid of Ants Permanently in Your House).

घरात एकही मुंगी दिसणार नाही

साखरेमध्ये बोरॅक्स पावडर

साखर आणि बोरॅक्स पावडरच्या मदतीने आपण लाल मुंग्यांना पळवून लावू शकता. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साखर आणि एक चमचा बोरॅक्स पावडर घेऊन मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा, आणि ज्याठिकाणी मुंग्या दिसतील, त्याठिकाणी स्प्रे करा.

लोखंडी तव्यावर ‘असा’ करा कुरकुरीत डोसा, पाहा १ ट्रिक-नॉन स्टिक तव्यापेक्षा खरपूस मस्त डोसा झटपट

लिंबू

घरातून लाल मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात लिंबाचा रस मिसळा. जिथून मुंग्या बाहेर पडतील, तिथे स्प्रे करा. लिंबाच्या रसातील उग्र गंधामुळे मुंग्या पळ काढतील.

मीठ

मिठाच्या वापरानेही मुंग्या घरातून पळ काढतील. यासाठी जिथे मुंग्यांची फौज दिसेल, तिथे मीठ शिंपडा. मुंग्या लगेच पळून जातील.

कितीही घासले तरी दातांवरचा पिवळा थर जाता जात नाही? ५ रुपये खर्च, पाहा हा चमकदार उपाय

काळी मिरी पावडर

काळी मिरी पावडर फक्त स्वयंपाकात नसून, मुंग्यांना पळवून लावण्यासाठीही याचा वापर आपण करू शकता. घराच्या ज्या भागात मुंग्या दिसतात त्या ठिकाणी काळी मिरी पावडर शिंपडा. त्याजागी मुंग्या आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत.  

Web Title: Here's How to Get Rid of Ants Permanently in Your House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.