Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...

पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...

Keep your footwear clean and fresh during monsoon with these easy hacks : पाण्यात भिजून चपला बुटांना अत्यंत घाणेरडा वास येतो, तो टाळायचा म्हणून ४ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2023 02:16 PM2023-07-29T14:16:03+5:302023-07-29T14:32:31+5:30

Keep your footwear clean and fresh during monsoon with these easy hacks : पाण्यात भिजून चपला बुटांना अत्यंत घाणेरडा वास येतो, तो टाळायचा म्हणून ४ उपाय

Here’s how you can get rid of smelly feet and shoes during the monsoon. | पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...

पावसाळ्यात पाण्यात भिजलेल्या चपला-बुटांना दुर्गंधी येते? ४ सोपे उपाय- कुबट वास येणार नाही...

पावसाळा म्हटलं की तो जितका आनंद घेऊन येतो तितक्या समस्याही सोबत घेऊन येतो. पावसाळा हा आपल्याला कितीही अल्हाददायक आणि आनंदी वाटत असला तरीही पावसाळ्यात ओलाव्यामुळे अनेक छोट्या - मोठ्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा, सगळीकडे चिखल, हवेतील आर्द्रता या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा आपण पावसात भिजतोच. पावसात भिजल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, फंगल इंन्फेक्शन असे अनेक आजार होऊ शकतात.

पावसाळ्यात एक मुख्य समस्या सतावते ती म्हणजे पाण्यामुळे आपल्या चपला, बूट सतत ओले राहण्याची. पायांतील चपला, बूट दीर्घकाळ ओलेच राहिल्यामुळे पायाला फंगल इंन्फेक्शन होऊन एक प्रकारची दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे कित्येकदा आपले चपला, बूट दिवसेंदिवस ओलेच राहतात. या ओल्या चपला, बुट वेळीच स्वच्छ केले नाही तर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. तसेच हे दुर्गंधी येणारे चपला, बूट आपण असेच पायांत घातले तर अशीच दुर्गंधी आपल्या पायाला देखील येते. असे होऊ नये म्हणून काही सोपे घरगुती उपाय वापरुन आपण ही चपला, बुटातून येणारी दुर्गंधी नाहीशी करु शकतो(Here’s how you can get rid of smelly feet and shoes during the monsoon).

पावसाळ्यात चपला, बूट ओले राहिल्यामुळे येणारी दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी सोपे उपाय... 

१. लिंबाची साल वापरा :- पावसाळ्यात चपला, बूट एकदा का भिजले तर ते सहजासहजी सुकत नाहीत. यामुळे चपलांना आलेला वासही जाता जात नाही. अशावेळी त्यामध्ये रात्रभर लिंबाची किंवा संत्र्याची साल ठेवावी. संत्रं किंवा लिंबू यांसारख्या फळांच्या फ्रेश वासामुळे चपलांमधील दुर्गंध कमी होण्यास मदत होते.

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

२. बेकिंग सोडा :- बेकिंग सोडा हा मॉइश्चर वेगाने शोषून घेतो. त्याचसोबत तो दुर्गंध कमी करण्यासही मदत करतो. चपला, बूट ओले असतील तर त्यात थोडा बेकिंग सोडा शिंपडा व रात्रभर तसाच ठेवून द्यावा. सकाळी आपले चपला, बूट कोरडे होतील व घाण दुर्गंधीही दूर होण्यास मदत मिळेल. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

जुने झालेले मोजे फेकून देण्याची चूक करु नका ! मोज्यांचे करा ४ भन्नाट उपयोग...

३. कागदाचा वापर करावा :- चपला, बुटांमधून घाण दुर्गंधी किंवा कुबट वास येत असेल व ते ओले असतील तर कोरडे करण्यासाठी त्यात कागदाचे तुकडे पसरवून ठेवा. त्यामुळे चपला, बुटातील ओलावा शोषला जाईल आणि दुर्गंधही कमी होईल.

४. टॅल्कम पावडरचा वापर करावा :- पावसाळ्यात भिजलेल्या चपला, बुटांमधून येणारी दुर्गंध काढण्यासाठी त्यात टॅल्कम पावडर रात्रभर शिंपडून ठेवावी.  त्यामुळे दुर्गंध कमी होईल. चपला, बूट खूपच ओले झाले असतील तर ते पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात वाळण्यासाठी ठेवून द्यावे.

पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

Web Title: Here’s how you can get rid of smelly feet and shoes during the monsoon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.