Join us  

पिझ्झा बॉक्समध्ये असणाऱ्या त्या छोट्याशा पांढऱ्या स्टँडचा नेमका उपयोग तरी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2023 7:25 PM

Why does pizza come with a small table? : पिझ्झा बॉक्समध्ये येणाऱ्या त्या टेबलाच्या आकाराच्या छोट्याशा स्टँडचा उपयोग अतिशय महत्वाचा आहे, कसा ते पाहूयात...

पिझ्झा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पिझ्झा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला आपसूकच पाणी सुटत. वेगवेगळे व्हेजिटेबल आणि चमचमीत सॉस यांपासून बनलेला पिझ्झा खाण सगळेच पसंत करतात. मैद्याचा वापर करून तयार केलेला गोल जाडसर पिझ्झा बेस वापरून आपण पिझ्झा तयार करतो. घरातील लहान मुलांना वडे, सामोसे, पिझ्झा, बर्गर, पास्ता अशा चमचमीत आणि अनहेल्दी गोष्टी खायला मनापासून आवडतात. एरवी अतिशय कमी खाणारी मुलं असे पदार्थ समोर आले की मात्र दणकून खातात. जंक फूड आणि फास्ट फूडची लहान मुलांनाच काय मोठ्यांमध्येही क्रेझ असते.

फास्ट फूड म्हटलं की सर्वात पहिले डोक्यात पिझ्झाच येतो. ही डिश इटालियन जरी असली तरी, भारतात मात्र पिझ्झा आवडीने खातात. काहीवेळा आपण हा पिझ्झा एखाद्या रेस्टोरंट मधून ऑर्डर करतो तर कधी कधी घरी देखील बनवतो. पिझ्झा हा असा पदार्थ आहे की आपण कधीही, कुठेही, कोणीही तितक्याच आवडीने खाऊ शकत. आपण बरेचदा भूक लागल्यावर पिझ्झा लगेच बाहेरून ऑर्डर करतो. हा पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर तो छान आकर्षक पॅकिंग बॉक्समध्ये पॅक करून आपल्यापर्यंत अतिशय उत्तमरीत्या पोहोचवला जातो. या पिझ्झ्यासोबतच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो यांची छोटी छोटी पाकीट देखील दिली जातात. यासोबतच जर आपण निरखून पाहिले असेल तर पिझ्झा बॉक्समध्ये पिझ्झाच्या बरोबर मधोमध एक टेबलाच्या आकारासारखे दिसणारे छोटे स्टॅन्ड ठेवलेले असते. ते नेमके का ठेवलेले असते किंवा त्याचा नेमका उपयोग तरी काय असतो? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच नेमकं उत्तर काय आहे ते पाहूयात. (Here's What That Little Plastic Table In Your Pizza Box Really Does).

आपण बाहेरून विकत आणलेला पिझ्झा बॉक्स उघडताच, आपल्या डोळ्यांना पिझ्झाच्या बरोबर मधोमध असलेलं एक छोटस स्टॅन्ड दिसत. या स्टँडचा नेमका उपयोग तरी काय असतो ते  पाहूयात. 

१. जेव्हा आपण बाहेरून पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा तो आपल्यापर्यंत बॉक्समध्ये छान पॅकिंग करुन पोहोचविला जातो. पिझ्झा पॅकिंग करताना त्यावरचे जे टॉपिंग किंवा चीज असते ते बॉक्सच्या वरच्या बाजूला चिटकून त्याचे टॉपिंग विस्कळीत होऊन खराब होऊ नये. तसेच ऑर्डर करून तो पिझ्झा आपल्याकडे येईपर्यंत आहे तसाच राहावा. बॉक्सच्या वरच्या बाजूला चिटकून खराब होऊ नये म्हणून बॉक्स आणि पिझ्झाचे टॉपिंग यात एक प्रकारची गॅप राहावी या हेतूने ते स्टॅन्ड पिझ्झाच्या बरोबर मधोमध ठेवले जाते. 

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

२ स्मार्ट झटपट ट्रिक्स, प्लास्टिक पिशवीची घाला नाजूक -लहानशी घडी, शेकडो पिशव्या सहज साठवा!

२. यासोबतच, आपण पाहिले असेल तर पिझ्झाच्या कडा या थोड्या जाड्या असतात. पिझ्झा बॉक्समध्ये देताना त्याचे त्रिकोणी आकारातील तुकडे करून दिले जातात. परंतु काहीवेळा या पिझ्झाच्या कडा जाड असल्यामुळे एका हाताने पिझ्झाचा तुकडा उचलणे शक्य नसते. अशावेळी पिझ्झाचा तुकडा तोडण्यासाठी हातांसोबतच या स्टँडचा वापर केला जातो. एका हाताने पिझ्झा पकडून दुसऱ्या हातात ते स्टँड घेऊन त्याच्या टोकदार बाजूचा वापर करून या पिझ्झाच्या कडा आपण एकमेकांपासून वेगळ्या करून अगदी सहज पिझ्झाचा तुकडा तोडू शकतो. 

अशाप्रकारे पिझ्झाच्या बरोबर मध्यभागी ठेवलेल्या या छोट्याशा स्टँडचा आपण उपयोग करु शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरल