डान्स म्हटलं की आपली पावलं आपोआप थिरकायला लागतात. आपलं वय जितकं कमी तितका आपल्या अंगात उत्साह जास्त आणि आपण सहजरित्या एखादी गोष्ट करु शकतो. याबरोबरच आपल्याला एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल तर विचारालयलाच नको. ती गोष्ट करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. मूळात आपल्यात उत्साह आणि आनंद असेल तर मग कोणत्याही वयात आपण नवीन गोष्ट शिकू शकतो आणि तितक्याच उत्साहाने ती करुही शकतो. असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला असून यामध्ये एक वयस्कर आजी डान्य शिकताना दिसत आहेत.
पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या या आजी अतशिय उत्साही असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसते. पांढऱ्या केसांचा डोक्यावर आंबाडा बांधलेला आसल्याने त्यांचे वय जास्त असल्याचा आपल्याला अंदाज येतोच. त्यांच्यासोबत असलेला तरुण त्यांना डान्सच्या स्टेप्स करुन दाखवत आहे. त्याही तितक्याच हुशारीने या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. गरबा हा गुजरातमधील प्रसिद्ध डान्स प्रकार असून हे दोघेही गरबा करताना दिसत आहेत. या आजींनी मागून पुढे पदर घेतलेला असल्याने कदाचित त्याही गुजराती कुटुंबातील असण्याची शक्यता आहे.
a
आलिया भटच्या गंगूबाई चित्रपटातील ढोलीडा या गाजलेल्या गाण्यावर या आजी डान्स करतात. तब्येतीने लठ्ठ असल्या तरी तो तरुण करत असलेली प्रत्येक स्टेप त्या अगदी छान पद्धतीने करताना दिसतात. इन्स्टाग्रामच्या गरबा लव्हर या पेजवर त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर अनेकांनी या आजींच्या डान्सला पसंती असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गरबा डान्सच्या स्टेप्स काहीशा वेगवान असतात त्यामुळे हा डान्स काही मिनीटांसाठी केली तरी खूप थकायला होते. मात्र आजी चेहऱ्यावर हसू घेऊन अतिशय आनंदाने हा डान्स करत असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्यातील उत्साहाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.