Lokmat Sakhi >Social Viral > वाढदिवसाच्या केकची लावली वाट! ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्याने केकवर भलतंच लिहून पाठवलं आणि..

वाढदिवसाच्या केकची लावली वाट! ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्याने केकवर भलतंच लिहून पाठवलं आणि..

Hilarious Message On Birthday Cake: ऑनलाईन केक मागवताना ग्राहकाने सांगितलं एक आणि विक्रेत्याने केलं दुसरंच काहीतरी... बघा कशी घडली ही मजेशीर गोष्ट... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2024 11:55 AM2024-02-06T11:55:06+5:302024-02-06T14:09:20+5:30

Hilarious Message On Birthday Cake: ऑनलाईन केक मागवताना ग्राहकाने सांगितलं एक आणि विक्रेत्याने केलं दुसरंच काहीतरी... बघा कशी घडली ही मजेशीर गोष्ट... 

Hilarious message on birthday cake stunned internet, Viral story of an online delivery of cake | वाढदिवसाच्या केकची लावली वाट! ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्याने केकवर भलतंच लिहून पाठवलं आणि..

वाढदिवसाच्या केकची लावली वाट! ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्याने केकवर भलतंच लिहून पाठवलं आणि..

Highlightsज्यांनी या केकची ऑर्डर दिली होती, त्यांनी स्वत:च केकचा फाेटो आणि हा मजेशीर किस्सा सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण असतो. यादिवशी अगदी केकपासून ते डेकोरेशनपर्यंत सगळंच कसं अगदी स्पेशल असावं, असं वाटतं. ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, ती व्यक्ती तर खुश असतेच. पण तिच्यावर प्रेम करणारेही या दिवशी विशेष आनंदी असतात. या आनंदाच्या भरात जर आपण वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला आणखी आनंदी करण्यासाठी काही खास प्लॅनिंग केलं आणि एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने आपल्या त्या प्लॅनिंगचा पचका केला, तर काय होतं याची कल्पनाही न केलेली बरी. असाच एक मजेशीर पण वाढदिवसाच्या केकची पुर्णपणे वाट लावून टाकणारा किस्सा मुंबईमध्ये घडला असून त्या केकची मजेशीर गोष्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Hilarious message on birthday cake stunned internet)

 

तर त्याचं झालं असं की मुंबईतल्या एका व्यक्तीने इशा नावाच्या एका व्यक्तीच्या वाढदिवसासाठी ऑनलाईन केक ऑर्डर केला. ऑनलाईन डिलिव्हरीसाठी ऑर्डर देताना त्याने केकसोबत मेणबत्त्या पाठवाव्या तसेच केकवर "Happy birthday Isha" असं लिहून पाठवावं असं सांगितलं.

पोटावरचे टायर्स कमीच होत नाहीत? करिना कपूर सांगतेय तो व्यायाम करा- पोट होईल सपाट 

किंवा मग Happy birthday असं लिहिलेलं स्टिकर लावावं आणि खाली "Isha" लिहावं असं सुचवलं. हेच इंग्रजीमधून त्यांनी put a happy birthday sticker and write "Isha" if possib असं लिहिलं. आता एवढी स्पष्ट सूचना करूनही केक विक्रेत्याने गडबड केली आणि मग सगळाच गोंधळ झाला.

 

केक विक्रेत्याने त्या केकवर हॅप्पी बर्थडे असं स्टिकर तर लावलंच. पण पुढे चक्क Isha possib असं लिहून पाठवलं.

केस खूप राठ- कोरडे झाले? ५ आयुर्वेदिक उपाय- केसांवर येईल चमक आणि वाढतील भराभर

आता हे असं लिहिलेला केक जेव्हा समोर आला असणार तेव्हा जिचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीचा आणि ज्याने केक ऑर्डर केला त्या व्यक्तीचा चेहरा नक्कीच पाहण्यासारखा झाला असणार. ज्यांनी या केकची ऑर्डर दिली होती, त्यांनी स्वत:च केकचा फाेटो आणि हा मजेशीर किस्सा सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

 

Web Title: Hilarious message on birthday cake stunned internet, Viral story of an online delivery of cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.