Join us  

अवॉर्ड सोहळ्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन घेतली पहिला केमो, हिना खान सांगते मी पक्क ठरवलंय की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 11:34 AM

Hina Khan Revealed About Her Cancer Diagnosis: आपल्याला कॅन्सर झाला आहे हे माहिती असूनही हिना खान हिने ती गोष्ट जेवढी सहजतेने स्वीकारली. ते खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. (actress Hina Khan suffering from stage three breast cancer)

ठळक मुद्देहिना म्हणते आजारासमोर झुकणं मला मान्य नाही. त्यामुळे मी त्याला अधिकाधिक नॉर्मल राहून सामोरं जाणार आहे.

अभिनेत्री हिना खानने तिला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं सांगितलं आणि ते ऐकूनच तिचे चाहते खचून गेले. आज कॅन्सरवर अनेक उपचार उपलब्ध आहेत. कॅन्सरचा रुग्ण या आजारातून पुर्णपणे बाहेर येऊन एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो. पण तरीही हा आजार झाल्याचे कळताच अनेकांना धडकी भरते. हिनाची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांचीही हीच अवस्था झाली. पण खुद्द हिना मात्र या परिस्थितीतही अतिशय स्थिर आणि संयमी दिसून आली. तिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यामध्ये ती सांगतेय की पहिल्या केमोला जाण्यापुर्वी तिने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावून पुरस्कार स्वीकारला आणि तिथून ती थेट दवाखान्यात गेली. तिची ती पोस्ट अतिशय व्हायरल झाली असून त्यामध्ये सगळेच जण तिच्या जिद्दीचं आणि आजाराला अतिशय संयमाने सामोरं जाण्याच्या तिच्या धाडसाचं कौतुका करत आहेत. (Hina Khan attended the event and went straight up to the hospital for her first chemo)

 

हिना म्हणते की ती जेव्हा पुरस्कार सोहळ्यासाठी गेली तेव्हा तिला माहिती होतं की आता यानंतर तिला पहिली केमो  घ्यायला जायचं आहे. यानंतर तिचं आयुष्य पुर्णपणे बदलून जाणार आहे आणि ते खूप जास्त आव्हानात्मक असणार आहे. पण तरीही त्या क्षणी ती थोडीही विचलित झाली नाही.

९० टक्के लोक 'इथे' चुकतात, म्हणूनच तर केस गळून पातळ होतात, बघा तुम्हीही तेच करता का?

उलट तिने अधिकाधिक नॉर्मल होण्याचा प्रयत्न केला. ती म्हणते की मी ठरवून टाकलं आहे की माझ्या आजाराकडे मी स्वत:ला पुन्हा एकदा नव्याने शोधण्याची संधी म्हणून पाहणार आहे. या आजाराशी लढण्याचं माझ्याजवळचं पहिलं हत्यार असणार आहे माझी सकारात्मकता. 

 

हिना म्हणते आजारासमोर झुकणं मला मान्य नाही. त्यामुळे मी त्याला अधिकाधिक नॉर्मल राहून सामोरं जाणार आहे. आणि तेच मला कितपत जमत आहे हे तपासून पाहण्यासाठी मी त्या सोहळ्याला हजेरी लावली होती.

पावसाळी हवेमुळे गुडघे, कंबर कुरकुरायला लागले? बघा सांधेदुखी कमी करणारा १ आयुर्वेदिक उपाय

तिने तिच्या चाहत्यांनाही हेच सांगितलं आहे की तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी सगळ्यात आधी स्वत:ला शांत करा, धीर ठेवा. आणि त्यानंतर त्याला आव्हानाला सामोरं जा. कधीही हार मानू नका. मागे फिरू नका. हिनाच्या या शब्दांनी तिच्या चाहत्यांनाही नक्कीच बळ मिळेल, नवी उमेद मिळेल. 

 

टॅग्स :हिना खानसोशल व्हायरलकर्करोग