Join us  

जपानचे राजदूत लखनऊच्या बिर्याणीवर झाले फिदा! पाहा व्हायरल पोस्ट, ते म्हणतात बिर्याणी म्हणजे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 12:49 PM

Hiroshi Suzuki Ambassador of Japan to India is fascinated by Lucknow biryani he Praised the same : बिर्याणी खाऊन झाल्यानंतर एक कौतुकाची पोस्टदेखील लिहिली आहे.

भारत आणि जपान या दोन देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांबाबत आपल्याला माहित आहे. भारतीय नेते ज्याप्रमाणे जपानमध्ये जाऊन तेथील गोष्टींबाबत समजून घेतात. त्याचप्रमाणे जपानमधील बरेच नामवंत लोक भारतात काही कामानिमित्त किंवा भेट देण्यासाठी येतात. जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भारताच्या पाककलेतील विविधतेबाबत मनापासून कौतुक केले. यावेळी त्यांनी काही भारतीय पदार्थांचा आस्वादही घेतला. नुकतीच सुझुकी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले असून त्यामध्ये त्यांनी लखनऊच्या बिर्याणीचे विशेष कौतुक केल्याचे दिसते. बिर्याणी खाऊन झाल्यानंतर एक कौतुकाची पोस्टदेखील लिहिली आहे (Hiroshi Suzuki Ambassador of Japan to India is fascinated by Lucknow biryani he Praised the same).

सुझुकी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्याला आवडलेल्या लखनवी बिर्याणीचे विशेष कौतुक केले आहे. ५ सेकंदांचा एक व्हिडिओ आणि बिर्याणी खातानाचा  १  फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत सुझुकी यांनी आपल्या बिर्याणीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओत हॉटेलचा कर्मचारी (वेटर) एका खास बाऊलमधून राजदूत हिरोशी सुझुकी यांच्या ताटात बिर्याणी वाढतो आहे. तसेच राजदूतसुद्धा त्याच्याकडे अगदीच उत्सुकतेने बघताना दिसत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत राजदूत काळ्या रंगाचा कोट घालून बाऊलमध्ये बिर्याणी खाताना दिसत आहेत. २ दिवस सलग लखनवी बिर्याणी, मी खाल्लेली आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट बिर्याणी असे कॅप्शनही त्यांनी या पोस्टला दिले आहे. 

शनिवारी रात्री त्यांनी केलेली ही पोस्ट जवळपास ४ लाख युजर्सनी पाहिली असून अनेकांनी ती लाईक केली आहे. इतकेच नाही तर या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी त्यांना हैजराबाद आणि बंगाल येथील बिर्याणी एकदा खाऊन पाहा असे आवाहन केले आहे. मात्र जपानी राजदूतांना भारतीय पदार्थ आवडल्याने भारतीय नेटीझन्स त्यांच्यावर भलतेच खूश झाले आहे. भारतीय पाककला अतिशय वैविध्यपूर्ण असून परदेशातील लोकांनाही त्याची भुरळ पडली नाही तरच नवल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नजपान