Lokmat Sakhi >Social Viral > Miss Universe स्पर्धा आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित - मूल असलेल्या महिलांनाही मिळणार स्पर्धेत एन्ट्री

Miss Universe स्पर्धा आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित - मूल असलेल्या महिलांनाही मिळणार स्पर्धेत एन्ट्री

Miss Universe Beauty Pageant to allow married women and Mother from 2023 : जगातल्या सर्वोच्च स्पर्धांपैकी एक असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे निकष बदलणे ही खरंच महिलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 02:14 PM2022-08-22T14:14:03+5:302022-08-22T14:15:59+5:30

Miss Universe Beauty Pageant to allow married women and Mother from 2023 : जगातल्या सर्वोच्च स्पर्धांपैकी एक असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे निकष बदलणे ही खरंच महिलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे.

Historic Decision of Miss Universe Pageant Organizers; Married women with children will also get entry in the competition | Miss Universe स्पर्धा आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित - मूल असलेल्या महिलांनाही मिळणार स्पर्धेत एन्ट्री

Miss Universe स्पर्धा आयोजकांचा ऐतिहासिक निर्णय; विवाहित - मूल असलेल्या महिलांनाही मिळणार स्पर्धेत एन्ट्री

Highlightsआता मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशाप्रकारच्या नियमांचे बंधन राहणार नाही. २०२३ सालच्या स्पर्धेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

महिलांचे करिअर म्हणजे मूल व्हायच्या आधी किंवा मूल मोठे झाले की मगच. एकदा मूल झाले की त्यांच्या करीअरला चांगलाच ब्रेक लागतो (Miss Universe Beauty Pageant). आई म्हणून मुलाची जबाबदारी महत्त्वाची असताना अनेकदा आयुष्यात इतर गोष्टींना दुय्यम स्थान देण्याची वेळ कित्येक महिलांवर येते. लग्न, मूल या वैयक्तिक आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असल्याने तरुण वयात करिअरमध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या संधी किंवा उर्मी असतानाही महिलांना ही गोष्ट काहीशी मागे ठेवावी लागते. आईची जबाबदारी महत्त्वाची असल्याने याला कोणतेच क्षेत्र अपवाद नाही यातही कौटुंबिक आधार नसेल किंवा इतर काही अडचणी असतील तर महिलांना आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेण्याशिवाय पर्याय नसतो (New Rules to allow married women and Mother from 2023). 

(Image : Google)
(Image : Google)

महिला म्हणून सर्व आघाड्यांवर लढत असताना संसार आणि मूल ही अडचण वाटू नये यादृष्टीने मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या आयोजकांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत आता विवाहित महिला आणि मातांनाही सहभागी होता येणार आहेत. त्यादृष्टीने स्पर्धेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याने या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. संसार किंवा मूल यांमुळे आपण अडकून गेलो, करिअरमध्ये मागे पडलो असे महिलांना कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर नक्कीच वाटते. मात्र वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टी आडकाठी न वाटता तो आपला खंबीर पाठिंबा आणि ऊर्जा असावी यादृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 

जगातल्या सर्वोच्च स्पर्धांपैकी एक असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे निकष बदलणे ही खरंच महिलांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. तुमचं लग्न झालं आहे की नाही, तुम्हाला मुलं आहेत की नाही याचा आता या स्पर्धेशी काहीही संबंध नाही. २०२३ सालच्या स्पर्धेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. याआधी मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी महिला अविवाहित असावी, तिला मूल असू नये असे निकष लावण्यात आले होते. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांना लग्न, गर्भधारणा हे टाळावे लागत होते. मात्र आता मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशाप्रकारच्या नियमांचे बंधन राहणार नाही. त्यामुळे जगभरातील अनेक सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. 

२०२० सालची मिस युनिव्हर्स ठरलेली मेक्सिकोची अँड्री मेझा हिने या नव्या नियमांचं कौतुक केलं आहे. सध्याचे नियम खूपच लिंगभेद करणारे आणि अतार्किक असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे. भारताच्या हरनाझ कौर संधूने मिस युनिव्हर्स २०२१ च्या मुकुटावर आपले नाव कोरले. पंजाबस्थित हरनाझ संधूने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या ७० व्या मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरनाझ सिंधू ही मिस युनिव्हर्स हा किताब पटकावणारी तिसरी भारतीय ठरली. त्यापूर्वी १९९४ मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हा किताब मिळाला होता तर २००० मध्ये लारा दत्ता ही मिस युनिव्हर्स ठरली होती.
 

Web Title: Historic Decision of Miss Universe Pageant Organizers; Married women with children will also get entry in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.