Join us  

विकतचा गुलाल कशाला यंदा होळीसाठी घरीच बनवा ऑरगॅनिक गुलाल! फक्त ५ मिनिटांचं सोपं काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2023 7:29 PM

Holi colours tips: How to make natural Holi color's at home नैसर्गिक गोष्टी वापरुन आता घरीच बनवा रंग.

होळी या सणासाठी प्रत्येक जण आतुर आहे. रंगाची उधळून करणारा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात या सणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. रंगपंचमी, होळीचा सण प्रत्येक वयोगटातील लोकांकडून साजरा होतो. एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होतो. बाजारात अनेक रंगाचे गुलाल मिळतात. काही गुलाल चांगले असतात. तर, काही गुलाल केमिकलयुक्त असतात. ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. ज्यामुळे लहान मुलांची कोमल त्वचा रुक्ष व कोरडी होते.

होळीच्या मौजमजेमध्ये आपण आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणं आवश्यक. आपण ऑरगॅनिक गुलालचा वापर करून होळी साजरी करू शकता. आपण हे गुलाल कमी साहित्यात, काही मिनिटात घरी बनवू शकता. चला तर मग गुलाल तयार करून, लोकांवर रंगाची उधळून करूया..

गुलाबी गुलाल

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीटरूटचे काप घाला. त्यात किंचित पाणी मिसळून,  बीटरूटची पेस्ट तयार करा. एका बाऊलमध्ये कोर्न फ्लोर अथवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात १ टेबलस्पून गुलाब जल मिक्स करा. त्यानंतर तयार बीटरूटची पेस्ट मिक्स करा. अशा प्रकारे गुलाबी गुलाल रेडी.

आता तेल न वापरताही घरीच करता येतील फ्रायम, ३ सोप्या पद्धती- खा मनसोक्त कुरकुरीत फ्रायम आणि पोंगे

हिरवा गुलाल

मिक्सरच्या भांड्यात पालक आणि कोथिंबीर घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून मिश्रण वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कोर्न फ्लोर अथवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात एक टेबलस्पून गुलाब जल मिक्स करा. त्यानंतर तयार पालक - कोथिंबीरची पेस्ट मिसळा. अशा प्रकारे हिरवा गुलाल रेडी.

लाल गुलाल

होळीच्या दिवशी लाल गुलाल अधिक वापरला जातो. यासाठी ३ चमचे कुमकुम, १ चमचा चंदन पावडर आणि ५ चमचे मैदा घ्या. या तिन्हींचे मिश्रण करून लाल गुलाल तयार करता येईल. बाजारातून विकत घेतलेली कुमकुम शुद्ध असावी हे लक्षात ठेवा.

पिवळा गुलाल

पिवळ्या रंगासाठी एका बाऊलमध्ये ३ चमचे हळद,  २ चमचे तांदळाचे पीठ आणि १ चमचा चंदन पावडर घ्या. हे तिन्ही मिश्रण मिक्स करा. तुमचा ऑरगॅनिक पिवळा गुलाल तयार होईल. अशा प्रकारे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून आपण इतर रंगही सहज घरी बनवू शकता.

टॅग्स :होळी 2022त्वचेची काळजीसोशल व्हायरलसोशल मीडिया