Join us  

रोज घराची साफसफाई करायला कंटाळा येतो? ५ टिप्स, जास्त मेहनत न करता घर दिसेल स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:54 AM

Home Cleaning Hacks : तुम्ही स्वयंपाकासोबतच ओट्याची स्वच्छताही करू शकता. असे केल्याने तुमचे स्वयंपाकघर घाण होणार नाही आणि तुम्हाला नंतर ते स्वच्छ करावे लागणार नाही.

ठळक मुद्देमिक्सर, वॉशिंगमशीन अशा प्रत्येक उपकरणांना कापडाचे कव्हर असतात. मशिन, मिक्सरचा वापर झाल्यानंतर कापडाच्या कव्हरनं झाकून  ठेवा जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही.  तुम्ही स्वयंपाकासोबतच ओट्याची स्वच्छताही करू शकता. असे केल्याने तुमचे स्वयंपाकघर घाण होणार नाही

रोज ऑफिसची,  घरातली इतर कामं करता करता थकवा  जाणवल्यास आपण ना घर स्वच्छ ठेवू शकत ना स्वत:ची काळजी घेत.  घर स्वच्छ ठेवण्यासाठी  मोलकरीण ठेवणं प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही. (Home Cleaning Hacks) अशावेळी घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल असा प्रश्न पडतो. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत घर स्वच्छ ठेवू शकता. (How to clean House quickly)

अंथरूण व्यवस्थित ठेवा

सकाळी उठल्यानंतर लगेचंच सर्व अंथरूण घडी घालून व्यवस्थित ठेवा. जर ते तसंच पडून राहीलं तर नंतर खूप पसारा दिसेल. असं केल्यानं काही मिनिटात तुमचं घर टापटीप दिसेल.

कमी सामान ठेवा

घरात शक्य तितकं कमीत कमी सामान ठेवा. असं केल्यानं घर जास्त खराब दिसणार नाही जास्त साफसफाईसुद्धा करावी लागणार नाही. जितकं कमी सामान असेल तितकी कमी मेहनत घर स्वच्छ करण्यासाठी लागेल.  नको असलेल्या वस्तू घरातून  कमी करता येतील असं पाहा.

डोअरमॅट नक्की ठेवा

डोअरमॅट घरात प्रत्येक ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. मुख्य दरवाजा, बाथरूम, टॉयलेच्या बाहेर, बेडरूमच्या दरवाज्याजवळ  तुम्ही डोअरमॅट ठेवू शकता. 

किचन डेकोरेट करण्याच्या स्मार्ट, स्वस्तात मस्त ट्रिक्स; फक्त ५०० रुपये खर्च करुनही किचन दिसेल नवं..

जेवण बनवताना साफ-सफाई करा

तुम्ही स्वयंपाकासोबतच ओट्याची स्वच्छताही करू शकता. असे केल्याने तुमचे स्वयंपाकघर घाण होणार नाही आणि तुम्हाला नंतर ते स्वच्छ करावे लागणार नाही. स्वयंपाक करताना घाण होताच, आपण ती त्याच वेळी स्वच्छ करावी. कोणतेही काम नंतरसाठी सोडू नका, असे केल्याने काम काही मिनिटांत होईल आणि कमी कष्टात तुमचे घर स्वच्छ होईल.

रंगावरून ट्रोल होणारं हे स्टायलिश जोडपं आहे कोण? ८ वर्षांपासून करत होते एकमेकांना डेट

उपकरणं वापर झाल्यानंतर झाकून ठेवा.

मिक्सर, वॉशिंगमशीन अशा प्रत्येक उपकरणांना कापडाचे कव्हर असतात. मशिन, मिक्सरचा वापर झाल्यानंतर कापडाच्या कव्हरनं झाकून  ठेवा जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही.  जर फर्निचर किंवा मशिनवर डाग लागले असतील तर तुम्ही बेकींग सोडा आणि लिंबाच्या मदतीनं हे डाग काढू शकता.  

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया