Lokmat Sakhi >Social Viral > Home Cleaning hacks :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत

Home Cleaning hacks :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत

Home Cleaning hacks: या काही गोष्टींचा वापर करून पहा.. खिडक्या होतील आरशासारख्या चकाचक, खिडक्या पुसण्याचं काम आता एकदम सोपं...(how to clean windows)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 07:19 PM2022-02-11T19:19:57+5:302022-02-11T20:22:41+5:30

Home Cleaning hacks: या काही गोष्टींचा वापर करून पहा.. खिडक्या होतील आरशासारख्या चकाचक, खिडक्या पुसण्याचं काम आता एकदम सोपं...(how to clean windows)

Home Cleaning hacks : How to clean the window glass? Use these home remedies | Home Cleaning hacks :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत

Home Cleaning hacks :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत

Highlightsपुसल्यानंतरही खिडक्या दिसतात मळकट, भुरकट? ३ उपाय... घरीच तयार होईल विंडो क्लिनर !

सगळं घर स्वच्छ, चकाचक असतील आणि खिडक्यांच्या काचा मात्र तशाच कळकट, धुरकट झालेल्या असतील, तर मग घराचं साैंदर्यही मार खातं... बरं खिडक्या पुसताना बऱ्याच जणींना येणारी एक अडचण म्हणजे खिडकी पुसली आणि ती वाळली की पुन्हा तशीच भुरकट, धुरकट दिसू लागते. ती खिडकी पाहून आपण ती पुसली आहे की नाही, असंच आपल्याला वाटू लागतं.. खिडक्यांचं असं होऊ नये आणि खिडक्याही (window cleaning) आपल्या घरासारख्या चकाचक रहाव्यात म्हणूनच घरच्या घरी (Home Cleaning hacks) हे काही विंडो क्लिनर (home made window cleaner) तयार करून बघा.. 

 

१. खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरतं.. यासाठी एक वाटी व्हाईट व्हिनेगर घ्या. त्यात तेवढंच पाणी टाका. एका स्प्रे बाटलीमध्ये हे मिश्रण भरून ठेवा. खिडक्यांच्या काचांवर या मिश्रणाचा फवारा मारा आणि नंतर एखाद्या सुती कपड्याने खिडकी पुसून घ्या. या पाण्याचा सुवास यावा, असं वाटत असेल तर त्यात तुमच्या आवडत्या अत्तराचे किंवा इसेंशियल ऑईलचे काही थेंब टाका.

 

२. व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा वापर करूनही खिडक्यांची स्वच्छता करता येते. यासाठी एक वाटी पाणी, एक वाटी व्हिनेगर आणि अर्धी वाटी बेकिंग सोडा एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. एका कपड्यावर बेकिंग सोडा घ्या आणि तो कपडा खिडक्यांच्या काचांवर घासा. आता यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण कांचांवर फवारा. त्यानंतर सुती, मऊ कपड्याने काचा चांगल्या पुसून घ्या. हा उपाय केल्यामुळे काचा चांगल्या चकचकीत होतील आणि अजिबातच धुरकट दिसणार नाहीत. 
 

Web Title: Home Cleaning hacks : How to clean the window glass? Use these home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.