Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीआधी पाण्याची टाकी साफ करायची? १ ट्रिक-टाकीत न शिरता कोपरा न कोपरा होईल स्वच्छ

दिवाळीआधी पाण्याची टाकी साफ करायची? १ ट्रिक-टाकीत न शिरता कोपरा न कोपरा होईल स्वच्छ

Home Cleaning in Diwali (Panyachi taki kashi swatch karaychi) : फक्त बाहेरील बाजूने नाही तर आतल्या बाजूने टाकी स्वच्छ होणं महत्वाचं असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:08 PM2023-10-31T13:08:01+5:302023-10-31T14:09:30+5:30

Home Cleaning in Diwali (Panyachi taki kashi swatch karaychi) : फक्त बाहेरील बाजूने नाही तर आतल्या बाजूने टाकी स्वच्छ होणं महत्वाचं असते.

Home Cleaning in Diwali : How to Clean a Plastic Water Tank At Home | दिवाळीआधी पाण्याची टाकी साफ करायची? १ ट्रिक-टाकीत न शिरता कोपरा न कोपरा होईल स्वच्छ

दिवाळीआधी पाण्याची टाकी साफ करायची? १ ट्रिक-टाकीत न शिरता कोपरा न कोपरा होईल स्वच्छ

दिवाळीचा (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळीआधी साफ-सफाई करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. (Diwali Cleaning Tips) दिवाळीच्या वेळेस अनेकजण पाण्याची टाकीसुद्धा स्वच्छ करतात. घरातील इतर वस्तू स्वच्छ करण्याच्या तुलनेत टाकी साफ करणं अवघड वाटतं. (How to Clean Water Tank at Home Step by Step Guide)

फक्त बाहेरील बाजूने नाही तर आतल्या बाजूने टाकी स्वच्छ होणं महत्वाचं असते कारण टाकीतले पाणी रोजच्या वापरात असते अशात अस्वच्छ टाकीमुळे दुषित पाण्याशी आपला संपर्क आल्यास आजार होण्याची शक्यता असते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. (How to Clean Your Water Storage Tank)

सगळ्यात आधी टाकी खाली करा, घरीच तयार करा क्लिनर

पाण्याची टाकी साफ करण्यासाठी सगळ्यात आधी  टाकीतलं पाणी काढून टाकी खाली करून घ्या. त्यानंतर टाकीचे आऊटलेट वॉल्व उघडून टाकी उघडा. टाकीत थोडं पाणी  राहते तेव्हा एखाद्या टॉवेलच्या मदतीने टाकी स्वच्छ करा. नंतर एक क्लिनिंग मिश्रण तयार करा.

ज्यामुळे टाकीचा आतला भाग साफ आणि बॅक्टेरीया मुक्त राहील. क्लिजिंग मिक्सचर तयार करण्यासाठी एका बादलीत पाणी गरम करून त्यात कपडे धुण्याची डिटर्जेंट पावडर किंवा लिक्वीड घाला. आत त्यात ५ ते ६ चमचे बेकींग सोडा घाला. या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिसळल्यानंतर याचे सोल्यूशन बनून तयार होईल.

टाकी-स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

पाण्याच्या रिकाम्या टाकीमध्ये क्लिनिंग मिश्रण घाला आणि स्पंज किंवा कापडाच्या मदतीने व्यवस्थित लावून रगडून घ्या. टाकीचे सर्व भाग व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर वायपरला कापड लावून टाकीच्या आत न शिरता साफसफाई करता येईल.

कॅल्शियमने खच्चून भरलेत स्वस्तात मिळणारे ५ पदार्थ; नियमित खा- हाडं होतील बळकट

टाकी साफ करण्यासाठी त्यात डिटर्जेंटचे पाणी घालून किंवा क्लिनिंग सोल्यूशन घालून टँकमध्ये व्यवस्थित फिरेल असा लांब ब्रश किंवा मॉप आत घालून टाकी  साफ करता येईल. यादरम्यान स्टिल ब्रिसल्सचा ब्रश किंवा स्टिलच्या स्पंजचा वापर करू नका. अन्यथा प्लास्टीकच्या टाकीवर स्क्रॅचेच येऊ शकतात. 

उरलेल्या वरणाचा करा कुरकुरीत डोसा; ही रेसिपी एकदा ट्राय करा-कधीच डाळ वाया जाणार नाही

टाकीचा बाहेरचा भाग साफ करण्यासाठी तुम्ही टुथब्रशचा वापर करू शकता.  टाकी साफ करताना थंड पाण्याचा वापर करा. सगळ्यात आधी टाकी व्यवस्थित स्वच्छ करून १ तासासाठी सुकू द्या. टाकी व्यवस्थित सुकल्यानंतर पाणी भरून टाकी बंद करून भरून ठेवा.  या उपायाने तुम्ही टाकी सहज स्वच्छ करू शकता. याशिवाय बॅक्टेरिया तयार होण्याता धोकाही टळेल.

Web Title: Home Cleaning in Diwali : How to Clean a Plastic Water Tank At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.