नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. देवीच्या स्वागतासाठी सर्वजण व्यस्त आहेत. देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्व भक्तांना आपले घर सुंदर सजवायचे असते. सजावट करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे. (Cleaning Tips and Home Tips) प्रत्येक कोपऱ्यातली धूळ साफ केल्याशिवाय तुमचे घर स्वच्छ दिसत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला घरातील धूळ घालवण्यासाठी काही उत्तम उपाय सांगणार आहोत. (How to do home dusting)
काही तासांत घर स्वच्छ करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे संपूर्ण घरातील धूळ आणि माती काढून टाकणे. स्वयंपाकघरातील डब्यापासून ते सोफा आणि बेडपर्यंत, घरातील सर्व वस्तू ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसून टाका. तुम्हाला फक्त ओलसर कापडाने आणि नंतर कोरड्या कापडाने वस्तू पुसायची आहे. यामुळे संपूर्ण घराची साफसफाई त्वरित होते. सगळ्यात आधी घरातल्या खराब वस्तू बाहेर काढा. (how to properly clean a home)
साफ सफाईसाठी लिक्विड तयार करा
घराची साफसफाई करताना अनेकवेळा काही हट्टी डाग निघण्याचे नाव घेत नाहीत. अशा स्थितीत, आपण स्वतः द्रव घरी तयार करून धुळीपासून मुक्त होऊ शकता. तुम्हाला फक्त 1 कप पाण्यात 1 चमचे व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालायचे आहेत. हे धुळीपासून डागांपर्यंत सर्व काही सहजतेने साफ करतात.
शरीरातल्या घातक युरीक अॅसिडला बाहेर फेकेल 'हा' पदार्थ; हाडांची दुखणी राहतील लांब
लाकडाचं सामान असं साफ करा
लाकडी वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिंबाची मदत घेऊ शकता. 1 कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर आणि अर्धा लिंबू घालून द्रव तयार करा आणि स्पजचा वापर करून तुम्ही सामान स्वच्छ करू शकता. यामुळे जास्त पैसे आणि वेळ न घालवता फर्निचर लवकरता लवकर स्वच्छ होऊ शकतं.
देव्हारा कसा साफ कराल?
कमीत कमी वेळेत देव्हारा स्वच्छ करण्यासाठी सर्व मूर्ती गंगाजल वापरून स्वच्छ करा. सगळ्यात आधी सर्व मूर्ती, प्रतिमा बाजूला काढून घ्या त्यानंतर देव्हारा साफ करा. काळे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण वापरू शकता. देव्हारा लाकडाचा असेल तर धुतल्यानंतर लगेच स्वच्छ पुसा नाहीतर खराब होण्याची शक्यता असते.