Lokmat Sakhi >Social Viral > Home Cleaning Tips :  खिडक्या उघडताच घरात खूपच धूळ येते? 5 हॅक्स वापरा, घर नेहमी दिसेल स्वच्छ

Home Cleaning Tips :  खिडक्या उघडताच घरात खूपच धूळ येते? 5 हॅक्स वापरा, घर नेहमी दिसेल स्वच्छ

Home Cleaning Tips : तुम्ही कोणतेही व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. व्हॅक्यूम क्लिनर कापडापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे धूळ काढू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 09:09 PM2022-05-29T21:09:25+5:302022-05-30T15:15:12+5:30

Home Cleaning Tips : तुम्ही कोणतेही व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. व्हॅक्यूम क्लिनर कापडापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे धूळ काढू शकतो.

Home Cleaning Tips :  How to reduce dust in house | Home Cleaning Tips :  खिडक्या उघडताच घरात खूपच धूळ येते? 5 हॅक्स वापरा, घर नेहमी दिसेल स्वच्छ

Home Cleaning Tips :  खिडक्या उघडताच घरात खूपच धूळ येते? 5 हॅक्स वापरा, घर नेहमी दिसेल स्वच्छ

अनेक वेळा आपले घर कसे स्वच्छ करावे हे समजत नाही.  ही समस्या अनेकांना आहे. कारण त्यांच्या घरात भरपूर धूळ आहे. विशेषत: तुमच्या घराच्या आजूबाजूला बांधकाम सुरू असेल तर घरात दररोज धूळ आणि माती साचते. (Home Cleaning Tips) ही समस्या प्रत्येक घराची आहे, परंतु दररोज धूळ साफ करणे सोपे नाही. ही धूळ अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे अनेकांना फुफ्फुसाचा संसर्ग होऊ शकतो, धुळीमुळे दम्याच्या रुग्णांना खूप त्रास होतो. अशा स्थितीत धूळ तुमच्या घरापासून दूर ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. (How to reduce dust in house)

1) वॅक्यूम क्लिनर

तुम्ही कोणतेही व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. व्हॅक्यूम क्लिनर कापडापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे धूळ काढू शकतो. याचा वापर करून तुम्ही पडदे स्वच्छ करू शकतात, गाद्या स्वच्छ करू शकता. टेबल, कोपरे, धूळ, फ्रीज, शेल्फ इत्यादी साफ करू शकता.

2) दारावरील धूळ साफ करता येते

अनेकदा आपण धूळ उडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे धूळ घरातून निघून जात नाही, तर ती फक्त त्याची जागा बदलते. फॅन्सी पंख असलेले डस्टर घेण्यात काही अर्थ नाही. धूळ साफ करण्यासाठी, मायक्रोफायबर असलेले कापड घ्या आणि त्यात थोडे पांढरे व्हिनेगर घालून धूळ साफ करण्याचा प्रयत्न करा. हे फॅन्सी क्लिनरप्रमाणेच काम करेल.

3) चपलेच्या धुळीकडे लक्ष द्या

बाहेरची चप्पल घरात आणणं योग्य नाही. तुम्हाला वाटेल की ही खूप छोटी गोष्ट आहे, परंतु एका संशोधनानुसार, घरातील 80% पर्यंत धूळ चप्पलमुळे येऊ शकते. सर्व प्रथम, शूज घराबाहेर किंवा शू रॅकवर ठेवण्यास सुरुवात करा. यासोबतच दारावर जाड डोअरमॅट्स ठेवावेत. तुम्ही फक्त ही छोटीशी युक्ती करून पहा आणि तुम्हाला जाणवेल की घर पूर्वीपेक्षा खूपच स्वच्छ दिसू लागले आहे.

4) एसी,  कूलरचे फिल्टर बदला

ही एक युक्ती आहे ज्याकडे लोक लक्ष देत नाहीत. एसीची सर्व्हिसिंग करतानाही एअर फिल्टर बदलण्याची गरज नाही असे त्यांना वाटते, पण ही पद्धत योग्य नाही. वास्तविक, महागडे एअर प्युरिफायर घेण्यापेक्षा तुमच्या सध्याच्या कूलिंग किंवा हीटिंग सिस्टमचे फिल्टर बदलणे चांगले. आपल्याला उच्च दर्जाचे फिल्टर स्थापित करण्याची देखील आवश्यकता नाही, परंतु प्रत्येक 2-3 महिन्यांनी ते बदलणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या घरातील धूळ 30-50% कमी होऊ शकते.

5) ज्या वस्तूंकडे लक्ष नसते अशा वस्तू स्वच्छ करा

घराच्या भिंती इत्यादी पुसणे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.  भिंती स्वच्छ कापडाने स्वच्छ केल्या पाहिजेत. गलिच्छ कापडाने स्वच्छ करू नये.  यासाठी तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर देखील वापरू शकता.  वॅक्यूम क्लिनर धुळीचे कण सहज काढू शकते.

Web Title: Home Cleaning Tips :  How to reduce dust in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.