Lokmat Sakhi >Social Viral > Home Cleaning Tips : उशांचे मळलेले कव्हर न धुताच २ मिनिटात स्वच्छ होतील; पाहा मस्त ट्रिक

Home Cleaning Tips : उशांचे मळलेले कव्हर न धुताच २ मिनिटात स्वच्छ होतील; पाहा मस्त ट्रिक

Home Cleaning Tips : वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी बाजारातून विकत घेतल्या जातात आणि तुम्हाला प्रत्येक रंगात किंवा फॅब्रिकमध्ये बेडशीटचे डिझाइन सहज मिळतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 03:37 PM2022-10-21T15:37:46+5:302022-10-21T16:36:03+5:30

Home Cleaning Tips : वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी बाजारातून विकत घेतल्या जातात आणि तुम्हाला प्रत्येक रंगात किंवा फॅब्रिकमध्ये बेडशीटचे डिझाइन सहज मिळतील.

Home Cleaning Tips : How to wash pillows without washing | Home Cleaning Tips : उशांचे मळलेले कव्हर न धुताच २ मिनिटात स्वच्छ होतील; पाहा मस्त ट्रिक

Home Cleaning Tips : उशांचे मळलेले कव्हर न धुताच २ मिनिटात स्वच्छ होतील; पाहा मस्त ट्रिक

बेडशिट, उशा कव्हर्स घराला केवळ सुंदर लुक देत नाहीत तर बेडशिट, उशांचे कव्हर्स पाहून एक वेगळी प्रतिमा तयार होते.  कव्हर्सचा सतत वापर केल्यानंत हळूहळू खराब व्हायला लागतात आणि नंतर एक वेळ येते जेव्हा आपण रात्री झोपताना त्यांचा वापर करू शकत नाही. (Home Cleaning Tips) अनेकवेळा असे घडते की नवीन उशांनाही वास येऊ लागतो किंवा उशांवर धूळ आणि माती साचते. (How to wash pillows without washing)

वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी बाजारातून विकत घेतल्या जातात तुम्हाला प्रत्येक रंगात किंवा फॅब्रिकमध्ये बेडशीटचे डिझाइन सहज मिळतील. आजकाल प्रिंटेड बेडशीटचा ट्रेंड खूप बघायला मिळत आहे. दिसायला सुंदर असले तरी बेडशिट लवकर मळतात त्यामुळे बेडशिट स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स माहित असल्या तर घर स्वच्छ करण्यास जास्त वेळ लागत नाही.

घरात असलेल्या सर्व उशा धुणे केवळ कठीणच नाही तर त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते. आता तुम्हाला उशा धुण्याची गरज नाही कारण  तुम्हाला न धुता उशा स्वच्छ करण्याचा एक सोपा मार्ग सांगत आहोत, ज्याचा तुम्ही अवलंब करू शकता.

स्टिकचा वापर 

उशीवरची सर्व धूळ किंवा घाण काठीने बाहेर पडेल असे म्हणतात म्हणून तुम्ही काठीच्या मदतीने उशी स्वच्छ करू शकता. काठीला कापड लावून तुम्ही उशी स्वच्छ करू शकता. यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील, परंतु तुमच्या उशा पूर्णपणे स्वच्छ आणि नवीन सारख्या असतील.

बेकींग सोडा

उशा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी उशीवरील धूळ किंवा डागांवर फक्त 1 चमचा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर ब्रशच्या मदतीने घासून घ्या. साधारण 10 ते 15 मिनिटे असेच राहू द्या. ते सुकल्यावर हाताने घासून स्वच्छ करा. यामुळे उशा स्वच्छ राहतील आणि वास येणार नाही.

टूथपेस्ट

उशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता. यासाठी  ब्रश आणि टूथपेस्ट घ्या आणि उशीवर साचलेल्या घाणीवर टूथपेस्ट लावा. नंतर ब्रशच्या मदतीने घासून 10 मिनिटे असेच ठेवा. टूथपेस्ट कोरडी झाल्यावर हलक्या हातांनी काढा आणि उशी स्वच्छ करा. उशी नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ठिकाणी ठेवा. त्यावर कव्हर ठेवा जेणेकरून घाण उशीवर बसणार नाही. दर आठवड्याला उशीचे कव्हर बदला. उशीवर डाग असल्यास हाताने स्वच्छ करा.

Web Title: Home Cleaning Tips : How to wash pillows without washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.