वाढतं वजन फक्त पर्सनॅलिटी खराब करत नाही तर डायबिटीस, हाय ब्लडर प्रेशर, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल, हार्टसंबंधित समस्या उद्भवू शकतात. (Fat Burning Exercises You Can Do Right in Bed) फॅट बर्न करण्यासाठी चांगला आहार आणि रोज डाएट घेणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यानं फॅट बर्न होण्यासह इतर अनेक फायदे मिळतात. मूड चांगला राहतो. हाडं मजबूत होतात आणि आजारांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर रोज व्यायाम केल्यानं चेहऱ्यावर ग्लो येते. (Home exercises on bed to burn fat fast at home)
बऱ्याचशा महिला व्यायामामकडे दुर्लक्ष करतात. ऑफिस आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. सकाळी उठल्यानंतर २ व्यायाम केल्यानं तुम्ही तब्येत मेंटेन ठेवू शकता. दररोज फक्त 10 मिनिटे व्यायाम केल्याने तुम्हाला काही दिवसात खूप बदल जाणवेल. (Home exercises on bed to burn fat fast at home)
१) लेग ड्रॉप्स (Leg drops exercise)
विशेषत: तुमचे पोट, संपूर्ण शरीराचे पॉवरहाऊस आहे. मजबूत कोर नसल्यास, व्यायामादरम्यान पाठदुखी आणि सामान्य दुखापतींचा धोका वाढतो. ओटीपोट बळकट करण्यासाठी लेग ड्रॉप्स हा एक चांगला मार्ग आहे. लेग ड्रॉप्स हा पोटाचा व्यायाम आहे जो उदर आणि पाठीचा खालचा भाग मजबूत करतो आणि तुमच्या पाठीचे रक्षण करतो.
२) रिव्हर्स क्रंचेस
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि सपाट पोट मिळविण्यासाठी रिव्हर्स क्रंच हा एक उत्तम व्यायाम आहे. सामान्य क्रंचच्या तुलनेत, हा व्यायाम पोटाच्या स्नायूंवर कार्य करतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा व्यायाम फायदेशीर आहे.