Join us  

सेल डाऊन झाल्यास लगेच फेकू नका- करा एकदम देसी जुगाड, आठवडाभर तरी आरामात चालतील... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 9:10 AM

Home Hack: सेल डाऊन झाले असतील तर लगेच फेकू नका... हे २ उपाय करून पाहा...(Home Hack to Temporarily Charge your electric battery Cells)

ठळक मुद्देउपाय साधे- सोपे तर आहेतच पण अगदी फुकट होण्यासारखे आहेत. त्यामुळे एकदा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

टीव्हीचं रिमोट, एसीचं रिमोट, घड्याळ, लहान मुलांची खेळणी अशा कितीतरी वस्तूंमध्ये नेहमीच सेल टाकावे लागतात. वापर जेवढा जास्त असतो तेवढ्या वेगात सेल डाऊन होतात. बरेच जण सेल संपले की ते लगेच टाकून देतात. पण असं करू नका. त्याऐवजी काही साधे- सोपे उपाय करा. यामुळे पुढचे ८ दिवस तरी तुमचे सेल पुन्हा एक्टीव्ह होऊ शकतात. उपाय साधे- सोपे तर आहेतच पण अगदी फुकट होण्यासारखे आहेत. त्यामुळे एकदा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. (Home Hack to Temporarily Charge your Remote Cells)

सेल डाऊन झाले असल्यास उपाय

 

१. उन्हात ठेवा

रिमोटमधले किंवा लहान मुलांच्या खेळण्यांमधले सेल डाऊन झाले असतील तर ते काही तासांसाठी अगदी कडक उन्हामध्ये ठेवा.

स्कूलबॅग खरेदी करायची? ऑनलाईन खरेदीवर मिळतोय भरपूर डिस्काऊंट, लगेचच बघा स्वस्तात मस्त पर्याय

त्यानंतर पुन्हा रिमोटमध्ये किंवा खेळण्यात घालून पाहा. पुढच्या काही दिवसांसाठी तरी तुमची ही समस्या सुटलेली असेल... 

 

२. ॲल्युमिनियम फॉईल

हा दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलचा एक छोटा तुकडा लागणार असून हा उपाय mommywithatwist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कापूर- तूप एकत्र करा आणि बघा जादू, पिंपल्सपासून ते डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या गायब

यासाठी ॲल्युमिनियम फॉईलची एक अगदी छोटी गुंडाळी करून घ्या. त्यानंतर सेल जिथे लावतो तिथे जी तारेची स्प्रिंग असते त्या स्प्रिंगमध्ये ही गुंडाळी अडकवा. त्यानंतर सेल घाला. सेल ॲक्टीव्ह होऊन वस्तू पुन्हा सुरू होईल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी