पुर्वी सणासुदीला कपडे घेतले जायचे. त्यामुळे ते अगदीच जपून वापरले जायचे. जवळपास सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सारखी असल्याने आणि फॅशन नावाचा प्रकार त्या काळी एवढा फोफावला नसल्याने एकच एक कपडा वर्षानुवर्षे चालायचा. तोच तो पुन्हा पुन्हा घालायलाही वावगे वाटायचे नाही. पण आता मात्र सगळेच बदलले आहे. एक तर पैशाची आवक वाढली आणि दुसरं म्हणजे अगदी कमी किमतीतही चांगले कपडे मिळू लागले. त्यामुळे मग वरचेवर कपड्यांची खरेदी होते आणि कपाटाच्या एका कोपऱ्यात जुन्या कपड्यांचा मात्र ढिग साचत जातो. वापरलेले जुने कपडे कोणाला द्यावे, हा प्रश्न असतोच (Best Way To Reuse Your Old Clothes). त्यामुळे या काही टिप्स बघा आणि जुन्या कपड्यांचा कसा पुन्हा नव्याने वापर करायचा ते पाहा....(6 Tips for how to reuse old clothes)
जुन्या कपड्यांचा कसा पुन्हा वापर करायचा....
१. आता हा पहिला जो उपयोग बघणार आहोत, तो बहुतांश घरांमध्ये केला जातो.
तुमच्या घरातले जुने टॉवेल, कॉटन बेडशीट, कॉटन साड्या असतील त्याचे चौकोनी आकाराचे तुकडे करा. एकाला एक लावून ते चांगले ४ पदरी शिवून घ्या आणि ओटा पुसायला, हात पुसायला, फर्निचर पुसायला त्यांचा वापर करा.
२. कॉटनच्या साड्या आणि कॉटनचे बेडशीट असतील तर एकाला एक जाेडून त्याची गोधडी शिवता येईल किंवा सतरंजीप्रमाणे खाली अंथरायलाही त्याचा उपयोग होईल.
३. एखादी गडद रंगाची छानशी साडी किंवा बेडशीट असेल तर त्याचे चौकोनी तुकडे करा. त्या तुकड्यांच्या चारही बाजुंनी छानशी लेस लावा आणि बसकन किंवा आसन म्हणून त्यांचा उपयोग करा.
प्या ५ ज्यूस, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! महागड्या क्रिम चोपडण्यापेक्षाही सोपा उपाय
४. गाऊन, पेटीकोट, स्कर्ट यांचा उपयोग वॉशिंग मशिनला कव्हर म्हणून करता येईल.
५. लहान मुलांचे टी- शर्ट, फ्रॉक असतील तर त्याचा उपयोग मिक्सरला कव्हर म्हणून करता येतो.
६. जीन्स किंवा कॉटन पॅण्ट असतील तर त्याच्या पायांची पिशवी शिवा. बाटली किंवा इतर काही लहान- सहान गोष्टी ठेवण्यासाठी चांगला वापर होतो.