उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाच्या घरी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सरबत, भाज्यांमध्ये लिंबाचा रस वापरला जातो. लिंबाचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत. लिंबू सुकल्यानंतर काहीजण तो कुकरमध्ये ठेवण्यासाठी वापरतात तर काहीजण फेकून देतात. कारण सुकलेल्या लिंबांमधून रस बाहेर येत असेल तरी तो कडवट असतो. लिंबू सुकल्यानंतर काय करता येईल याची अनेकांना कल्पना नसते. २ आठवड्यांपेक्षा जास्तवेळ ठेवल्यास लिंबू सुकतात. या लिंबाचा वापर घरातील कोणत्या कामांसाठी करता येईल ते पाहूया. (Benefits of Dried Lemon, why you should use daily)
जेवणात वापर करू शकता
सुकलेले लिंबू आंबट-गोड लागतात. जेवणात वेगवेगळ्या प्रकारे या लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. सुकलेले लिंबू, सूप, मासे बनवण्यासाठी कामात येतील. लिंबू कापून पाण्यात घालून हे पाणी पिऊ शकता किंवा हर्बल टी मध्येही याचा वापर करता येईल.
चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी
लिंबाचा वापर चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी केला जोत. रोज कांदा, भाज्या फळं कापून चॉपिंग बोर्ड खराब, मळकट दिसू लागतो. साबणानं स्वच्छ करण्याव्यतिरिक्त तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. सुकलेल्या लिंबाच एक नॅचरल क्लिंजर असते. ज्यामुळे चॉपिंग बोर्ड चमकतो. चॉपिंग बोर्डवर मीठ घालून लिंबानं घासा. यामुळे तुमचं अर्ध काम सोपं होईल. हे एक क्लिंजरप्रमाणे काम करतं, चॉपिंग बोर्डवर लिंबू घासून स्वच्छ करा.
भांडी धुण्यासाठी
जेवण बनवताना भांड्यांमध्ये तेलकट काहीही शिजवल्यास भांड्यांवर चिकट चिकटपणा जमा होतो. ही भांडी धुण्यासाठीही लिंबाचा वापर करता येतो. भांड्यावर लिंबू चोळल्यानंतरच तुम्हाला चिकटपणा निघालेला दिसेल.
लाद्या स्वच्छ होतात
सुके लिंबू घरातील फरशी, भिंतींच्या फरशा आणि किचन टॉप साफ करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. यापासून स्वच्छ एजंट घरी तयार करता येतो. क्लिनिक एजंट बनविण्यासाठी, कोरडे लिंबू कापून, मीठ घाला आणि त्यात पाणी घालून काही वेळ उकळवा. जेव्हा द्रावण उकळेल तेव्हा ते थंड करा आणि घर स्वच्छ करण्यासाठी वापरा. यामुळे घराचा प्रत्येक कोपरा उजळून निघेल.