Lokmat Sakhi >Social Viral > स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक

Home Hacks For Cleaning Dust In Sliding Window Track: खिडक्यांच्या काचा पुसणं सोपं आहे. पण त्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करणं हे महाकठीण काम.. म्हणूनच ते सोप्या पद्धतीने कसं करायचं पाहा. (How to clean the sliding window or sliding door track?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 11:20 AM2024-01-30T11:20:06+5:302024-01-30T11:21:18+5:30

Home Hacks For Cleaning Dust In Sliding Window Track: खिडक्यांच्या काचा पुसणं सोपं आहे. पण त्यांच्या ट्रॅकमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करणं हे महाकठीण काम.. म्हणूनच ते सोप्या पद्धतीने कसं करायचं पाहा. (How to clean the sliding window or sliding door track?)

Home hacks for cleaning dust in sliding window track, How to clean the sliding window or sliding door track? | स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक

स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये खूप घाण- माती अडकली? १ सोपा उपाय- विंडो ट्रॅक होईल चकाचक

Highlightsस्लायडिंग दरवाज्याचे किंवा खिडक्यांचे ॲल्यूमिनियमचे ट्रॅक कसे स्वच्छ करायचे ते पाहूया..

पुर्वी घरोघरी लाकडी खिडक्या असायच्या. या खिडक्यांच्या चौकटीही लाकडी असायच्या. त्यामुळे त्या खिडक्या पुसणं किंवा स्वच्छ करणं हे सोपं असायचं. ओल्या कपड्याने पुसून घेतली की झाली खिडकी चकाचक. पण आता मात्र बहुतांश घरांमध्ये स्लायडिंगच्या खिडक्या असतात. काही घरांमध्ये आणि विशेषत: फ्लॅट सिस्टिम असेल तर खोली आणि टेरेस किंवा बाल्कनी यांच्यामध्येही मोठा स्लायडिंग दरवाजा बसवलेला असतो (Home hacks for cleaning dust in sliding window track). अशा पद्धतीच्या स्लायडिंग दरवाज्याचे किंवा खिडक्यांचे ॲल्यूमिनियमचे ट्रॅक कसे स्वच्छ करायचे ते पाहूया.. (How to clean the sliding window or sliding door track?)

स्लायडिंग खिडक्यांचे ट्रॅक स्वच्छ करण्याचे उपाय

 

स्लायडिंग खिडक्यांचे जे ॲल्यूमिनियमचे ट्रॅक असतात, त्यात खूप धूळ, माती अडकते. याकडे दुर्लक्ष केलं तर घाण साचून साचून तो भाग अक्षरश: काळा पडतो. आपण बऱ्याचदा स्लायडिंग खिडक्या आणि दरवाजे पुसतो.

स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक

पण त्याच्या ट्रॅककडे मात्र दुर्लक्ष करतो. शिवाय तो भाग अतिशय अरुंद असल्याने स्वच्छ करायलाही कठीण असतो. म्हणूनच आता तुम्हाला कठीण वाटणारं हे काम अगदी सोपं आणि अगदी काही मिनिटांतच झटपट कसं करायचं ते पाहूया. हा उपाय nicelife.hacks's या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून तो करण्यासाठी आपल्याला एक जाडसर स्पंज लागणार आहे.

 

सगळ्यात आधी तर त्या खिडक्यांच्या ट्रॅकची जेवढी रुंदी आहे, तेवढ्या आकाराचा स्पंज घ्या. खिडक्यांच्या ट्रॅकवर स्पंज ठेवा आणि जिथे जिथे त्या ट्रॅकवर खोचा आहेत तिथे तिथे स्पंजवर खुणा करा आणि तो भाग थोडा कापून घ्या.

माधुरी दीक्षितचे जांभळ्या- गुलाबी साडीतले देखणे साैंदर्य- बांधणी सिल्कच्या या साडीची किंमत किती बघा.....

आता तो स्पंज ट्रॅकवर ठेवा. आता तुम्ही जिथे स्पंज थोडा कापला आहे, तो भाग बरोबर खिडकीच्या ट्रॅकच्या आतल्या बाजूमध्ये जाईल आणि तिथली घाण स्वच्छ होईल. सुरुवातीला कोरड्या स्पंजने माती काढून घ्या. त्यानंतर स्पंज ओला करून पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घ्या. खिडक्यांचे ट्रॅक चकाचक होतील. 

 

Web Title: Home hacks for cleaning dust in sliding window track, How to clean the sliding window or sliding door track?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.