Join us

स्वयंपाकघरात फार मुंग्या होतात? किचनच्या कोपऱ्यात ठेवा ५ वस्तू, मुंग्या होतील गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 18:38 IST

How To Get Rid OF Red And Black Ants : लसणाचा वास मुंग्यांना जराही आवडत नाहीत. मुंग्यांना पळवण्यासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे.

मुंग्या कोणत्याही ऋतूत किचनपासून बाथरूमपर्यंत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिरतात. (Health Tips) पावसाळ्यात मुंग्या तयार होण्याचं प्रमाण अधिकच वाढतं. इतकंच नाही तर एकदा मुंग्या झाल्या तर घरातून लवकर बाहेर निघण्याचं नावच घेत नाहीत. (Ants Removal Tips) मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर लोक करतात पण त्यामुळे खूपच खर्च होतो. याचा काहीच रिजल्ट दिसून येत नाही. घरात जर मुंग्या जास्त झाल्या असतील तर  घरातील काही वस्तूंचा वापर करून मुंग्यांना दूर पळवू शकता. या टिप्सच्या मदतीने तुमचं काम मोफत होईल. (How To Get Rid From Ants) 

काळी मिरी

किचनमध्ये ठेवलेल्या मसाल्यांमध्ये काळी मिरी हा सामान्य घटक आहे. हा मसाला मुंग्यांना पळवण्यासाठी उत्तम उपाय आहे. काळी मिरी पावडरने मुंग्यांना पळवणं खूपच सोपं होतं. यासाठी  घराच्या ज्या भागात मुंग्या दिसतात तिथे काळी मिरी पावडर शिंपडा.

लिंबू

लिंबू आणि त्याची सालं मुंग्यांना पळवण्यासाठी तुमची मदत करू शकता. लादी पुसताना पाण्यात लिंबाचा रस  घाला. लिंबाचा तीव्र वास मुंग्याला सहन होत नाही. ज्यामुळे मुंग्या घरात शिरणार नाहीत. लिंबू लिंबाची सालं घराच्या कोपऱ्यावर ठेवू शकता. या दोन्ही प्रकारे फायदा दिसून येईल. 

व्हिनेगर

मुंग्यांना व्हाईट व्हिनेगरचा वास अजिबात आवडत नाही. तुम्ही  घरात ठेवलेलं व्हिनेगर वापरू शकता.एका स्प्रे बॉटलमध्ये  घेऊन त्यात पाणी मिक्स करा. ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्या दिसतात त्या ठिकाणी व्हिनेगरच्या पाण्याचा स्प्रे करा. ज्यामुळे मुंग्या पळून जाण्यास मदत होईल.

लसूण

लसणाचा वास मुंग्यांना जराही आवडत नाहीत. मुंग्यांना पळवण्यासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे. लसणाच्या पाकळ्या वाटून याचा रस काढून एका वाटीत घ्या. नंतर हा रस स्प्रे बॉटलमध्ये घालून ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात तिथे शिंपडा.  ज्यामुळे मुंग्या लांब राहतील आणि घरात येणार नाहीत. 

तमालपत्र

तमालपत्राचा वास किटकांना दूर ठेवण्यासाठी परिणामकारक ठरतो.  तमालपत्र हाताने बारीक करून घराच्या कोपऱ्यात ठेवा. झुरळ, माश्या, मुंग्या  दूर करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया