टॉयलेट- बाथरूममध्ये पाण्याचा वारंवार वापर होतोच. त्यामुळे सारखं- सारखं पाणी लागून त्यांचे दरवाजे खालच्या बाजुने खराब (How to repair water damaged bathroom door?) होत जातात. सुरुवातीला दरवाज्यांचा रंग बदलतो, नंतर ते फुगतात आणि मग त्यांचे पापुद्रे निघतात आणि दरवाजांना चिरा पडतात. हळूहळू मग दरवाजांचा खालचा सगळाच भाग खराब होऊ लागतो. पावसाळ्याच्या दिवसात बाल्कनी किंवा वॉशिंग प्लेसच्या जवळ असणाऱ्या दरवाजाचेही असेच हाल होतात (how to make bathroom's wooden door waterproof?). यामुळे मग दरवाजा खूपच घाण तर दिसतोच, पण काही महिन्यांनी तो बदलावाही लागतो. हा खर्च काही थोडा नाहीच. त्यामुळेच घरात जर असे दरवाजे असतील, तर वेळीच हे काही घरगुती उपाय करा आणि पुढचा मोठा खर्च वाचवा.
बाथरुमच्या दरवाजांना ओल येत असेल तर...
१. वॉटरप्रुफ टेप
गळणारी टाकी किंवा बादली यांना लावण्यासाठी वॉटरप्रुफ टेप असताे. हा टेप वापरून आपण दरवाजांचं संरक्षण करू शकतो. यासाठी ट्रान्सफरंट असणारा वॉटरप्रुफ टेप खरेदी करा. दरवाजाला जिथपर्यंत ओल येते, तिथपर्यंत या टेपच्या पट्ट्या लावून टाका. दर २- ३ महिन्यांनी पट्ट्या बदलल्या तर खूपच चांगले. शिवाय ट्रान्सफरंट असल्याने दरवाज्यांचा लूकही खराब होत नाही. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा घराजवळच्या हार्डवेअर दुकानात वॉटरप्रुफ टेप मिळू शकतात.
२. तुंग तेल
लाकडी दरवाजांची फिनिशिंग वाढविण्यासाठी आणि पाण्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी तुंग तेल वापरण्यात येते.
खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय
हे तेल बाथरुमच्या दरवाजांच्या खालच्या बाजूने लावून टाका. सहा महिने किंवा वर्षभरातून एकदा दरवाजांवर या तेलाचा हात मारा. त्यामुळे दरवाजे खराब होणार नाहीत. हे तेल फर्निचरचे सामान मिळणाऱ्या दुकानांमध्ये मिळेल. किंवा तुम्ही ते ऑनलाईनही खरेदी करू शकता.
३. ऑईल पेंट
हा एक आणखी सोपा उपाय. तुमचा दरवाजा ज्या रंगाचा असेल त्या रंगाशी मिळता जुळता प्लास्टिक कोटेड ऑईल पेंट आणा आणि तो या दरवाजांवर जिथपर्यंत ओल येते, तिथपर्यंत लावून टाका. २०० ते २५० रुपयांत काम होऊन जाईल.
'सब से आगे होंगे हिंदुस्थानी...' महिला हॉकी टिमचा ढिण्चॅक डान्स! दणक्यात सेलिब्रेशन, बघा विजयी व्हिडिओ
४. ॲल्यूमिनियमचा पत्रा
दरवाजा जर मजबूत असेल आणि त्याला थोडे ओझे पेलू शकणार असेल तर हा उपाय करायला हरकत नाही. ॲल्यूमिनियमचा किंवा स्टीलचा पत्रा दरवाजाच्या आतल्या बाजूने खालून ठोकून घेतला तर दरवाजाचा खालचा भाग खराब होण्याचा प्रश्नच नाही.