Lokmat Sakhi >Social Viral > Odour From Bag: ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ

Odour From Bag: ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ

Easy ways to remove unpleasant odour: टिफिन बॅग, पर्स, जीमची बॅग, किंवा मग प्रवासाहून आल्यानंतर रिकामी झालेली बॅग.. यांच्यामधला कुबट वास जाता जात नाही.. म्हणूनच तर या बघा त्यासाठी काही ट्रिक्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 12:53 PM2022-05-16T12:53:19+5:302022-05-16T12:54:35+5:30

Easy ways to remove unpleasant odour: टिफिन बॅग, पर्स, जीमची बॅग, किंवा मग प्रवासाहून आल्यानंतर रिकामी झालेली बॅग.. यांच्यामधला कुबट वास जाता जात नाही.. म्हणूनच तर या बघा त्यासाठी काही ट्रिक्स.

Home Hacks: How to remove odour from tiffin bag, purses and other bags, 5 simple tricks | Odour From Bag: ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ

Odour From Bag: ऑफिसची पर्स, स्कुल बॅग, टिफिन बॅगमधला कुबट वास जाता जात नाही? ५ उपाय, बॅग नव्या-स्वच्छ

Highlightsबॅग नॉन वॉशेबल असल्याने त्या धुताही येत नाहीत. त्यामुळे मग दिवसेंदिवस त्या आणखीनच घाण होत जातात आणि त्यातून कुबट वास येऊ लागलो.

वेगवेगळ्या बॅगमधून येणारा कुबट वास (bad smell from bags) घालवून त्यांना पुन्हा फ्रेश कसं करायचं, हा खरंतर बऱ्याच महिलांना पडलेला प्रश्न. यात जर टिफिन बॅग असतील तर त्या बॅगांमध्ये थोडं थोडं तेल गळणं, किंवा काहीतरी खाद्यपदार्थ त्यात सांडणं हे तर नेहमीचंच असतं. या बॅग नॉन वॉशेबल (how to clean non washable bags?) असल्याने त्या धुताही येत नाहीत. त्यामुळे मग दिवसेंदिवस त्या आणखीनच घाण होत जातात आणि त्यातून कुबट वास येऊ लागलो.

 

तसंच काहीसं प्रवासाहून आल्यानंतर रिकाम्या केलेल्या बॅगचं असतं. पारोसे कपडे, ओलसर कपडे आपण बॅगमध्ये तसेच टाकून देतो. बॅग सारखी सारखी बंद असते. त्यामुळे मग आतल्या आत बॅगचा घाण वास येऊ लागतो. घरी आल्यानंतर आपण बॅग रिकामी करून टाकली तरी त्यातून तो कुबट वास काही जात नाही. म्हणूनच प्रवासी बँगांमधला दुर्गंध घालविण्यासाठीही या काही ट्रिक्स नक्कीच उपयोगी पडू शकतात. याशिवाय जीमचं साहित्य आणि कपडे घेऊन जाण्यासाठीही ज्या बॅग वापरल्या जातात, त्यांच्यातुनही काही दिवसांनी कुबट वास येऊ लागतो. त्यासाठीच हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा.(home remedies to remove odour from bag)

 

बॅगमधला दुर्गंध घालविण्यासाठी घरगुती उपाय
१. बॅग जर वॉशेबल असतील तर त्यांची स्वच्छता अतिशय सोपी आहे. कारण या बॅग थेट धुता येतात. पण अशा वॉशेबल बॅग धुण्यासाठी कधीही हार्ड डिटर्जंट वापरू नका. लिक्विड सोप किंवा सॉफ्ट डिटर्जंटचा वापर करूनच अशा बॅग धुवाव्या. अन्यथा त्या लवकर खराब होऊ शकतात.
२. नॉन वॉशेबल म्हणजेच ज्या बॅगा थेट धुता येत नाहीत, त्यांच्यातला दुर्गंध घालविण्यासाठी त्या बॅग पुर्णपणे रिकाम्या करा आणि उघड्या करून काही तास उन्हामध्ये ठेवा. यामुळे बॅगांमधला दुर्गंध बऱ्याच प्रमाणात कमी होतो.


३. जर उन्हात ठेवूनही बॅगांमधला दुर्गंध जात नसेल तर व्हिनेगर सोल्युशनचा उपयोग करून बघा. यासाठी २ चमचे पाणी, २ चमचे व्हिनेगर सोल्युशन एका वाटीत घ्या. त्यात लिक्विड सोपचे किंवा एखाद्या शाम्पूचे १- २ थेंब टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. एका कापसाचा बोळा किंवा नॅपकीनचा कोपरा या सोल्युशनमध्ये बुडवा आणि त्यानंतर तो बॅगच्या आतले कोपरे आणि इतर भागांवर घासा. त्यानंतर ४- ५ तास बॅग उघडी करून उन्हात ठेवून द्या. हा प्रयोग करताना बॅग सोल्युशनमुळे खूप ओली होणार नाही, याची काळजी घ्या. 


४. बेकींग सोडाही वापरू शकता. यासाठी बेकींग सोडा बॅगमध्ये शिंपडा आणि बॅगचं झाकण लावून टाका. किंवा एका वाटीत बेकींग सोडा ठेवा. ती वाटी बॅगमध्ये ठेवून द्या. बॅगचं झाकण लावून टाका. ४ ते ५ तासांनंतर झाकण उघडा. बॅगेतला दुर्गंध बेकींग सोडा शोषून घेतो.
५. कॉफी पावडरचा वापर करूनही बॅगेतला दुर्गंध घालवणं शक्य आहे. यासाठी आपण बेकींग सोड्याचा ज्या पद्धतीने वापर केला, त्याच पद्धतीने कॉफी पावडरचा वापर करावा. बॅगेतला दुर्गंध जाऊन बॅग पुन्हा फ्रेश होईल. 

 

Web Title: Home Hacks: How to remove odour from tiffin bag, purses and other bags, 5 simple tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.