Lokmat Sakhi >Social Viral > काठापदराची महागडी साडी फाटली? घाबरू नका, करा १ सोपा उपाय- साडी फाटली होती हे लक्षातही येणार नाही

काठापदराची महागडी साडी फाटली? घाबरू नका, करा १ सोपा उपाय- साडी फाटली होती हे लक्षातही येणार नाही

How To Repair Torn Silk Saree?: साडीमध्ये प्रत्येकीचा खूप जीव गुंतलेला असतो. अशी जिवापाड जपलेली सिल्कची साडी फाटली तर...... न घाबरता करून बघा हा सोपा उपाय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2023 02:08 PM2023-09-25T14:08:11+5:302023-09-25T14:10:02+5:30

How To Repair Torn Silk Saree?: साडीमध्ये प्रत्येकीचा खूप जीव गुंतलेला असतो. अशी जिवापाड जपलेली सिल्कची साडी फाटली तर...... न घाबरता करून बघा हा सोपा उपाय....

Home Hacks: How to repair torn silk saree? 1 simple trick for torn saree | काठापदराची महागडी साडी फाटली? घाबरू नका, करा १ सोपा उपाय- साडी फाटली होती हे लक्षातही येणार नाही

काठापदराची महागडी साडी फाटली? घाबरू नका, करा १ सोपा उपाय- साडी फाटली होती हे लक्षातही येणार नाही

Highlightsएखादी महागडी साडी फाटली असेल तर आता त्याचं वाईट वाटून घेणं साेडा, ती कपाटातली साडी बाहेर काढा आणि हा एक सोपा उपाय करून पाहा..

आपल्या कपाटातली एकेक साडी म्हणजे आपली एकेक आठवण असते. एरवी तुम्ही कितीही वेस्टर्न कपडे घालून मिरवा.. पण साडीत जेवढा जीव अडकलेला असतो, तेवढा तो अन्य कपड्यांमध्ये नक्कीच गुंतलेला नसतो. त्यात जर ती साडी महागडी, सिल्कची असेल तर काही विचारायलाच नको. ती साडी आपण अगदी सांभाळून सांभाळून वापरतो. नीट जपून ठेवतो. पण कधी अनावधानाने त्याच साडीला कोच पडला किंवा ती फाटली तर (How to repair torn silk saree?)...... मग मात्र जीव तीळ- तीळ तुटतो. तुमचीही अशी एखादी महागडी साडी फाटली असेल तर आता त्याचं वाईट वाटून घेणं साेडा, ती कपाटातली साडी बाहेर काढा आणि हा एक सोपा उपाय करून पाहा...(1 simple trick for torn saree)

 

सिल्कची फाटलेली साडी दुरुस्त कशी करायची?
हा उपाय इन्स्टाग्रामच्या mayurisareedraping या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फाटकी साडी दुरुस्त करण्यासाठी fusing tape उपयुक्त ठरतो. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही हा टेप घेऊ शकता. हा टेप साडी जिथे फाटली आहे, त्याच्या खालच्या बाजुने लावा.

हरनाज संधूची पिस्ता रंगाची साडी, असा क्लासिक देखणा लूक हवा तर बघा तिच्या खास टिप्स

साडीच्या वरच्या बाजूने एक सुती कपडा ठेवा आणि त्यावरून इस्त्री फिरवा. हा उपाय करताना साडीच्या खालीही एक सुती कपडा टाकावा. साडी चिटकून जाईल. इस्त्री खूप जास्त तापलेली नको. नाहीतर साडी जळू शकते. हा उपाय केल्यानंतरही साडी फाटलेलीच वाटत असेल, तर पुन्हा एकदा टेप लावून त्यावर इस्त्री फिरवा.

 

Web Title: Home Hacks: How to repair torn silk saree? 1 simple trick for torn saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.