Join us  

कोरोनाकाळात आणलेले मास्क घरात नुसतेच पडून आहेत? घ्या आयडीया, मास्कचे करा 3 भन्नाट उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 12:55 PM

Reuse of Surgical mask: कोरोना काळात (corona) आणलेले सर्जिकल मास्क (surgical mask) घरात तसेच पडून असतील, तर अशा पद्धतीने त्यांचा उत्तम उपयोग करता येईल...

ठळक मुद्देअजूनही बऱ्याच घरांमध्ये सर्जिकल मास्क तसेच पडून आहेत. ते मास्क आता बाहेर काढा आणि अशा पद्धतीने त्यांचा मस्त पुनर्वापर करा..

कोरोनाचं नाव काढलं तरी अजूनही अंगावर काटा येतो. ती दहशत, भीती थोडी कमी होऊन आता कुठे आपण मुक्तपणे मनमोकळा श्वास घेत आहोत आणि मास्क न घालता पुन्हा एकदा बिंधास्त सगळीकडे फिरत आहोत. मास्क घालणं जेव्हा सक्तीचं होतं तेव्हा बहुतांश घरांमध्ये सर्जिकल मास्कचे बॉक्सेस आणून ठेवले जायचे. पण कोरोनाची भीती कमी झाली आणि मास्कवर असलेली सक्ती उठली. त्यामुळे अजूनही बऱ्याच घरांमध्ये सर्जिकल मास्क तसेच पडून आहेत. ते मास्क आता बाहेर काढा आणि अशा पद्धतीने त्यांचा मस्त पुनर्वापर करा..(how can reuse surgical mask?)

 

सर्जिकल मास्कचे ३ भन्नाट उपयोग..१. मास्कच्या बेल्टचा वापर- मास्कचे जे इलॅस्टिकचे बेल्ट आहेत, त्याचा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग करता येतो. सगळ्यात आधी तर बेल्ट कापून मास्कपासून वेगळे करा. बेल्टची दोन्ही बाजूची टोके जाेडून त्याची गाठ मारा आणि रबरबॅण्ड म्हणून त्याचा वापर करा.- घरात लहान मुलं असतील पेन, पेन्सिली अशा वस्तू घरभर पडलेल्या असतात. या वस्तू एकत्र करून त्या या बेल्टच्या मदतीने बांधून ठेवता येतील. किंवा स्वयंपाक घरात भाज्यांच्या जुड्या बांधण्यासाठी, पिशव्यांची तोंडं बांधण्यासाठी हे बेल्ट कामी येतील. रबरबॅण्डचा उपयोग आपण जिथे जिथे करतो, तिथे तिथे हे बेल्ट वापरता येतात.

 

२. मास्कच्या कापडाचा उपयोग- मास्कचे दोन्ही बाजूचे बेल्ट कापल्यानंतर मधला जो भाग आहे, त्याची दोन फोल्ड देऊन चौकोनी घडी करा. ही घडी चारही बाजूने कापून तिला गोलाकार आकार द्या. प्रत्येक मास्क अशापद्धतीने कापून घ्या. एका छोट्या एअरटाईट डबीत हे सगळे गोल आकार भरून ठेवा. त्यात गुलाबजल टाका आणि डबी फ्रिजमध्ये ठेवून द्या. चेहऱ्याला रोजवॉटर लावण्यासाठी वाईप्सप्रमाणे त्याचा वापर होऊ शकतो.- असाच उपयोग नेलपेंट रिमुव्हींग वाईप्स म्हणूनही करता येईल. फक्त गुलाबजल ऐवजी नेलपेंट रिमुव्हर टाका. नेलपेंट काढायची असेल तेव्हा एक वाईप्स उचला आणि नखांवर घासा. वेगळा कापूस घेण्याची गरजच नाही. 

 

३. आकर्षक हेअर बो.. साधं रबरबॅण्ड म्हणून तर मास्कच्या बेल्टचा उपयोग करता येतोच. पण लहान मुलींसाठी आकर्षक हेअर बो तयार करण्यासाठीही मास्कचा उपायोग होतो. यासाठी आधी मास्कचे दोन्ही बाजूंचे बेल्ट कापून टाका. मास्कच्या चारही बाजूंचा एकेक सेमी भाग कापून घ्या. आता मास्कचे अलगदपणे ५ ते ६ फोल्ड करा. मधोमध मास्कचा बेल्ट बांधून घ्या. बटरफ्लाय आकार तयार होईल. जिथे बेल्ट लावला आहे, तिथे एखादा मोठा मोती चिटकवून टाका. केसांना लावण्यासाठी छान हेअर बो तयार.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकोरोना वायरस बातम्या