Join us  

मीठ डब्यात काढून पिशवी फेकून देता? 'या' पद्धतीने वापरा, घराची वाढेल शोभा-पूर्ण पैसे वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 9:08 AM

Home Hacks Kitchen Tips :  बऱ्याचदा मीठ वापरून झाल्यानंतर मीठाच्या पिशव्या फेकून दिल्या जातात मीठाच्या पिशवीचा वापर तुम्ही घरात वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता.

आपण मार्केटमधून जो काही सामान खरेदी करतो तो वेगवेगळ्या प्लास्टिकच्या किंवा कागदाच्या पाकिटांमध्ये पॅक केलेला असतो.  सामान वापरून झालं की पाकीट फेकून दिलं जातं. (How to Reuse Empty Salt Packets) मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. (Best From Waste Ideas)  बऱ्याचदा मीठ वापरून झाल्यानंतर मीठाच्या पिशव्या फेकून दिल्या जातात मीठाच्या पिशवीचा वापर तुम्ही घरात वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता. (Best out of waste salt packet) शोभेच्या वस्तू, हॅण्डबॅग्स अशा वेगवेगळ्या वस्तू यापासून बनवता येतात. 

१) मीठाची पिशवी फेकण्याऐवजी वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. लहान मुलांची खेळणी, पेन्सिल्स, कलर्स किंवा सोललेले शेंगदाणे, वाटाणे किंवा कोथिंबीर ठेवण्यासाठी तुम्ही या पिशवीचा वापर  करू शकता.

एकदम सॉफ्ट-स्पाँजी ताकातला ढोकळा घरीच करा; १ सिक्रेट पदार्थ घाला, परफेक्ट पांढरा ढोकळा खा

२) घर सजवण्यासाठीही मिठाची पिशवी उत्तम पर्याय आहे. टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनण्यासाठी मिठाची पिशवी कामात येईल. शोभेच्या अनेक वस्तू यापासून बनवता येतील. यासाठी सगळ्यात आधी मीठाची पिशवी बारीक स्ट्रिप्समध्ये कापून घ्या नंतर त्यापासून आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट यांसारखे अनेक वस्तू बनवू शकता.  या प्लास्टीकच्या पिशवीची चटईसुद्धा बनवता येते. यासाठी वेगवेगळे पॅकेट्स रिकामे करून जोडून घ्या. नंतर ही चटई तुम्ही जेवायला बसण्यासाठी किंवा इतर कामांसाठी वापरू शकता. 

दुधावर पराठ्यासारखी घट्ट साय येईल; दूध गरम करताना ५ ट्रिक्स वापरा-दुधावर जाड मलई येईल

३) या पिशवीने पेंट किंवा टाईल्स चांगल्या राहतात मिठाच्या रिकाम्या पिशव्या तुम्ही किचनमध्ये टाईल्सवर लावू शकता. यामुळे टाईल्स चांगल्या राहतील आणि तेलाचे, तुपाचे, मसाल्याचे डाग टाईल्सवर लागणार नाहीत. मीठाच्या पिशवीचे २-३ स्ट्रिप्स लांबच लांब कापून तुम्ही याची पायपुसणी देखील बनवू शकता. यासाठी प्लास्टीकच्या स्ट्रिप्स तुम्हाला व्यवस्थित शिवाव्या लागतील.

या पिशवीचा वापर करून तुम्ही सुंदर हॅण्डबॅगसुद्धा बनवू शकता. कापडाच्याखाली एखाद्या अस्तरप्रमाणे या प्लास्टीकच्या पिशवीचा वापर करता येऊ शकतो. मिठाची पिशवी स्वच्छ धुवून सुकवून तुम्ही त्या पिशवीत सेफ्टी पिन्स,  बॉब पिन्स, हेअर बॅण्ड्स, टिकल्यांचे पाकीट असं रोज लागणारं साहित्य ठेवू शकता. 

टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनकिचन टिप्स