Join us  

फ्रिजरमध्ये बर्फ जमा होतो? बटाटयाचा १ उपाय करा; लाईटबील येईल कमी-बर्फ जमा होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 4:16 PM

Home Hacks : हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बटाटा स्वच्छ धुवून दोन भागांमध्ये चिरून घ्या. त्यानंतर फ्रिजरमध्ये जमा झालेला बर्फ वितळवून बर्फ साफ करून घ्या.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की फ्रिजरमध्ये कोणतंही भाडं ठेवल्यानंतर ते भांडं चिकटतं. खूप मेहनत केल्यानंतरही फ्रिजरमधील भाडं निघत नाही. बर्फाचे मोठमोठे डोंगर तयार होतात. (How to remove frozen ice from freezer fast)  या बर्फाला वितळवणं खूप कठीण असतं.  एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही फ्रिजरमधील  बर्फ सहज काढून टाकू शकता. यामुळे कोणतंही भांडं चिकटणार नाही आणि बर्फाचे डोंगरही तयार होणार नाहीत. (Useful Kitchen Hacks)

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बटाटा स्वच्छ धुवून दोन भागांमध्ये चिरून घ्या. त्यानंतर फ्रिजरमध्ये जमा झालेला बर्फ वितळवून बर्फ साफ करून घ्या. त्यानंतर चिरलेल्या बटाट्याच्या तुकड्याने पूर्ण फ्रिजरमध्ये घासून घ्या. एकही कोपरा सुटणार नाही याची काळजी घ्या. ही ट्रिक तुमच्यासाठी बरीच फायदेशीर ठरेल. या उपायामुळे  फ्रिजरमध्ये बर्फाचे  पर्वत तयार होणार नाहीत. (How to Prevent Ice Buildup in Your Freezer)

फ्रिज सतत उघड-लाव करू नका

जर फ्रिजरमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा होत असेल तर त्यात जास्त मॉईश्चर असू शकतं. मॉईश्चर फ्रिजमध्ये येऊ नये यासाठी दिवसातून कमीत कमी वेळा फ्रिज उघडा. तुम्ही  जेव्हाही फ्रिज उघडता तेव्हा बाहेरील गरम हवा आत जाते आणि आतील थंड हवेसह मिसळून मॉईश्चर तयार होतं. त्यानंतर याचे बर्फात रूपांतर होते.

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात... 

फ्रिजरचं तापमान व्यवस्थित सेट करा

जर तुमच्या फ्रिजरमध्ये जास्त बर्फ तयार  होत असेल तर त्याचे तापमान १८ डिग्री फारेन हाईटवर सेट करा. जर फ्रिजरमध्ये यापेक्षा जास्त तापमाना सेट झाले तर  तापमान कमी करा. अन्यथा फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ तयार होईल.

फ्रिजमध्ये जास्त समान ठेवू नका

फ्रिजरमध्ये जास्त बर्फ जमा होऊ नये यासाठी जास्तीत जास्त सामान ठेवणं टाळा. फ्रिजरमध्ये जितकी जास्त जागा तितकं जास्त मॉईश्चर तयार होईल.  यातील मॉईश्चरचा बर्फ तयार होतो.

पोट-मांड्याचे फॅट सुटलंय? किचमधले 'हे' पदार्थ रोज खा; झरझर घटेल चरबी- स्लिम, मेंटेन दिसाल

फ्रिज नियमित साफ करत राहा

अनेकजण रोजच्या कामाच्या गडबडीत फ्रिज साफ करायला विसरतात. फ्रिज साफ करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सर्व खाद्यपदार्थ काढून एका आईसबॉक्समध्ये ठेवा. त्यानंतर फिजर एक  तासासाठी बंद करा आणि त्यानंतर साफ करा. 

टॅग्स :सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्ससोशल व्हायरल