स्वयंपाक घरात नेहमीच कात्री, सुरी, विळी अशा वस्तूंची मदत लागत असते. शिवाय या वस्तू नुसत्या असून उपयोगाच्या नसतात. त्यांना चांगली धार असेल तरच त्यांचा उपयोग होतो. पण बऱ्याचदा असं होतं की या वस्तू वापरून वापरून त्यांची धार हळूहळू बोथट होत जाते. अशी बोथट झालेली कात्री किंवा सुरी मग खूप उपयोगाला येत नाही. शिवाय तेवढ्या कारणासाठी ती टाकून देणंही उपयोगाचं नसतं (home hacks to sharpen knife and scissors or kaichi at home). म्हणूनच हे काही घरगुती उपाय पाहा आणि कात्रीला, चाकूला काही मिनिटांतच एकदम धारदार बनवून टाका.(how to sharpen knife and scissors at home?)
सुरी, कात्री यांना घरच्याघरी धार कशी लावावी?
१. कप आणि टुथपेस्ट
या दोन वस्तू सुरी, कात्री यांना धार लावण्यासाठी उपयोगी येतात. यासाठी सगळ्यात आधी ज्या कात्रीला, सुरीला धार लावायची आहे तिला थोडं टुथपेस्ट लावून घ्या. त्यानंतर एक जुना कप घ्या. त्या कपाच्या खालच्या किंवा वरच्या कडांवर टुथपेस्ट लावलेली कात्री किंवा सुरी काही मिनिटांसाठी घासा. चाकू, सुरी अगदी धारदार होतील.
लग्न, मौंज, केळवणात जेवणाच्या ताटाभोवती काढा सुंदर रांगोळी, झटपट होणारे ६ सोपे डिझाईन्स
२. सहान
देवघरात चंदन उगाळण्यासाठी सहान ठेवलेली असते. ती सहान वापरून चाकू, कात्रीला धार लावता येते. यासाठी सहानीवर तेलाचे ४ ते ५ थेंब टाका. त्यानंतर त्या भागावर ४ ते ५ मिनिटांसाठी चाकू किंवा कात्री थोडा जोर लावून घासा. काही मिनिटांतच चाकू अगदी धारदार झाल्यासारखा जाणवेल.
३. मीठ
कात्रीला धार लावण्यासाठी मिठाचा वापर करण्याचा एक भन्नाट उपाय shiprarai2000 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये मीठ घ्या.
कमी वयातच गुडघे दुखतात, पाठ- कंबर गळाली? कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ खा, हाडांचं दुखणं पळून जाईल
त्यानंतर त्या मीठात कात्री घाला आणि कात्रीच्या ब्लेडची पुढच्या काही मिनिटांसाठी उघडझाप करा. म्हणजेच कात्री मिठात चालवल्याप्रमाणे करा. हा उपाय केल्यानंतरही कात्री व्यवस्थित धारदार होईल.