Join us  

कपड्यांवरचे हट्टी डाग घालवण्याची सोपी ट्रिक, घरच्याघरी कपडे होतील ड्रायक्लिन केल्यासारखे चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 9:32 AM

Home made cloth stain remover : प्रत्येकवेळी ड्रायक्लिनिंग करणे आपल्याला परवडेलच असे नाही...

आपण रोजच्या रोज वेगवेगळे कपडे घालतो. बाहेर गेल्यावर हेच कपडे घालून आपण खातो कधी पेनाची शाई किंवा ऑईल असं काही ना काही आपल्या कपड्यांना लागतं. लहान मुलं तर कपड्यांना चॉकलेट, माती किंवा अगदी काहीही सहज पुसतात. यामुळे चांगले चांगले कपडे खराब होतात. अनेकदा महागडे कपडे केवळ डाग पडले म्हणून पडून राहतात. अशावेळी कपड्यांवरचे हे डाग घालवण्यासाठी आपण ते खूप घासतो, वेगवेगळ्या प्रकारचे साबण किंवा पावडरी वापरतो. मात्र हे डाग जातातच असं नाही. मग हे चांगले कपडे ड्रायक्लिनला टाकण्याशिवाय पर्याय नसतो. ड्रायक्लिनिंग करणे बरेच महाग असल्याने रोजच्या वापराच्या कपड्यांना ते करणे शक्य नसते. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास कपड्यांवरचे डाग निघणे शक्य होते. घरीच काही नैसर्गिक गोष्टी एकत्र केल्यास कपड्यांवरचे हट्टी डाग निघू शकतात. यासाठी नेमका कोणता उपाय करायचा पाहूया (Home made cloth stain remover)...

१. एका वाटीत थोडासा बेकींग सोडा घ्या, यातील अल्कलाईन गुणधर्म डाग जाण्यास उपयुक्त ठरतात.

२. त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस आणि व्हाईट व्हिनेगर घाला. लिंबातील सायट्रीक अॅसिड डाग घालवण्यास फायदेशीर असते. 

३. यामध्ये थोडे डीश वॉश लिक्विड आणि पाणी घालून हे मिश्रण एकत्र करायचे.

४.  हे मिश्रण कपड्यावरच्या डागावर लावायचे आणि स्क्रबरने किंवा जुन्या झालेल्या टूथब्रशने साफ करायचे. 

५. मग हे कपडे पाण्याने स्वच्छ धुतले की डाग निघून जाण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स