Lokmat Sakhi >Social Viral > पावसामुळे डास आणि माश्यांचा सुळसुळाट? १ सोपा घरगुती उपाय, डास-माश्या होतील गायब.....

पावसामुळे डास आणि माश्यांचा सुळसुळाट? १ सोपा घरगुती उपाय, डास-माश्या होतील गायब.....

Home Made Insect and Mosquito Repellent : एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 01:01 PM2023-07-20T13:01:49+5:302023-08-02T10:07:35+5:30

Home Made Insect and Mosquito Repellent : एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात.

Home Made Insect and Mosquito Repellent : Did the rain make mosquitoes and flies? 1 simple home remedy, mosquitoes and flies will disappear..... | पावसामुळे डास आणि माश्यांचा सुळसुळाट? १ सोपा घरगुती उपाय, डास-माश्या होतील गायब.....

पावसामुळे डास आणि माश्यांचा सुळसुळाट? १ सोपा घरगुती उपाय, डास-माश्या होतील गायब.....

राज्यभरात गेल्या ८ दिवसांपासून सलग तुफान पाऊस पडत आहे. पाऊस म्हटले की रस्त्यांवर, सोसायटीच्या आवारात, घराच्या आजुबाजूला आणि अगदी घराच्या गॅलरीत, खिडकीच्या आसपास सगळीकडेच पाणी साचते. पाऊस अजिबातच उघडला नाही तर हे पाणी लवकर वाळत नाही आणि याठिकाणी डास, माश्या, चिलटं यांचे साम्राज्य व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला त्यांची संख्या अगदी कमी असते पण कालांतराने ती इतकी वाढते की आपल्याला घरात बसणेही नको होते. एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात (Home Made Insect and Mosquito Repellent) . 

डास चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग होते . हे डास साधे असतील तर ठिक नाहीतर डेंगी, चिकनगुन्या यांचे डास असतील तर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांत असे आजार डोके वर काढतात आणि वेगाने पसरतातही. डास हे केवळ साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही डासांचे प्रमाण वाढू शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

याबरोबरच माश्यांचे प्रमाणही या दिवसांत वाढलेले असते. यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? पाहूया डास आणि माश्या पळवून लावण्यासाठी घरच्या घरी करता येईल असा सोपा आणि नैसर्गिक उपाय....

१. कडुलिंबाची वाळलेली पाने घेऊन त्याचा हाताने शक्य तितका बारीक चुरा करायचा. 

२. कांद्याची साले आणि लसणाची साले घ्यायची आणि त्याचाही बारीक चुरा करायचा. 

(Image : Google)
(Image : Google)

३. यामध्ये लवंग, तमालपत्र आणि कापूराच्या ४ ते ५ वड्या घालायच्या आणि हे सगळे मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची पावडर करुन घ्यायची. 

४. एखाद्या पणतीमध्ये किंवा मातीच्या दिव्यामध्ये हा पावडर घ्यायची आणि त्यामध्ये कापूराची वडी लावायची

५. काडेपेटीने ही वडी पेटवल्यास त्याखाली असणाऱ्या पावडरचा धूर होतो आणि तो घरात सगळीकडे पसरतो. 

६. यातील मसाल्याचे पदार्थ आणि कांदा, लसणाची उग्र साले यांच्या वासाने घरातील डास आणि माश्या निघून जाण्यास मदत होते. 
 

Web Title: Home Made Insect and Mosquito Repellent : Did the rain make mosquitoes and flies? 1 simple home remedy, mosquitoes and flies will disappear.....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.