Join us  

महागड्या टॉयलेट क्लीनरवर पैसे घालविण्यापेक्षा 'हा' उपाय करा, बाथरुमच्या टाईल्स- बेसिन लख्ख चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 5:48 PM

Home Made Toilet Cleaner Liquid: महागडे टॉयलेट क्लीनर लिक्विड वापरूनही टॉयलेट, बाथरुम मनाप्रमाणे स्वच्छ, चकचकीत होत नसेल तर लगेचच हा घरगुती उपाय करून पाहा...(how to clean yellow stains from toilet, bathroom tiles?)

ठळक मुद्देया लिक्विडवर आपण खूप जास्त पैसे तर खर्च करतो, पण तरीही मनाप्रमाणे स्वच्छता काही होत नाही.

टॉयलेट, बाथरुमची स्वच्छता हे एक अतिशय नियमितपणे करावे लागणारे काम. कारण त्यांच्या स्वच्छतेकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी लगेच दुर्गंधी येते, ते अस्वच्छ दिसू लागतात. त्यामुळे वेळात वेळ काढून ते काम प्राधान्याने करावे लागते. अशावेळी टॉयलेट- बाथरुमच्या स्वच्छतेचं काम झटपट व्हावं म्हणून आपण महागडे टॉयलेट क्लीनर लिक्विड घेतो. पण असं लक्षात येतं की या लिक्विडवर आपण खूप जास्त पैसे तर खर्च करतो, पण तरीही मनाप्रमाणे स्वच्छता काही होत नाही. टाईल्सवरचे, बेसिनवरचे पिवळट, काळपट डाग काही जात नाहीत (how to clean wash basin). तुमचाही असाच अनुभव असेल तर दर महिन्याला महागड्या टॉयलेट क्लीनरवर पैसे खर्च करणं सोडा (home made toilet cleaner liquid) आणि लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (how to clean yellow stains from toilet, bathroom tiles?)

 

टॉयलेट- बाथरुमची स्वच्छता करण्यासाठी होममेड टॉयलेट क्लीनर

टॉयलेट, बाथरुम आणि बेसिन अगदी स्वच्छ चकाचक करण्यासाठी घरच्याघरी घरगुती वस्तू वापरून टॉयलेट क्लीनर लिक्विड कसं तयार करायचं याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ diy2insta या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केस गळणं १५ दिवसांतच कमी करणारी ५ योगासनं!! फक्त ५ मिनिटांचा वेळ द्या- केस गळणं बंद

त्यानुसर टॉयलेट क्लीनर लिक्विड तयार करण्यासाठी आपल्याला लिक्विड सोप, टुथपेस्ट, व्हिनेगर आणि पाणी या ४ गोष्टी लागणार आहेत.

सगळ्यात आधी एका भांड्यात १ कप लिक्विड सोप, १ टेबलस्पून टुथपेस्ट आणि १ कप व्हिनेगर घ्या आणि ते एकमेकांत चांगलं मिसळा. यानंतर त्यामध्ये १ ग्लास पाणी टाका. 

 

आता हे मिश्रण तुमच्या टॉयलेट, बाथरुम आणि बेसिनवर टाकून ठेवा. त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी थोडं पाणी शिंपडून ती जागा ओलसर करून घ्या आणि ब्रशने घासून काढा. 

हेल्मेटमधून खूपच घाण वास येतो? बघा हेल्मेट स्वच्छ करण्याचे २ सोपे उपाय- दुर्गंधी होईल गायब 

हा उपाय केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की विकत मिळणाऱ्या टॉयलेट क्लीनर लिक्विडपेक्षा तुम्ही घरच्याघरी तयार केलेलं हे लिक्विड अधिक उत्तम असून त्यामुळे टाईल्स अगदी लख्ख चमकलेल्या दिसतील. 

 

 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी