Lokmat Sakhi >Social Viral > मिरची चिरल्याने हातांची आग होते? ५ उपाय, जळजळ कमी होऊन हातांना मिळेल थंडावा

मिरची चिरल्याने हातांची आग होते? ५ उपाय, जळजळ कमी होऊन हातांना मिळेल थंडावा

Burning hands due to chili: हा त्रास अनेक जणींना जाणवतो आणि त्यानंतर पुढचे जवळपास दोन- तीन तास काहीच सुचत नाही. म्हणूनच हे काही उपाय करून बघा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 01:01 PM2022-08-13T13:01:10+5:302022-08-13T13:02:15+5:30

Burning hands due to chili: हा त्रास अनेक जणींना जाणवतो आणि त्यानंतर पुढचे जवळपास दोन- तीन तास काहीच सुचत नाही. म्हणूनच हे काही उपाय करून बघा.. 

Home Remedies: Burning hands due to chili? How to reduce irritation of palm due to chopping mirch  | मिरची चिरल्याने हातांची आग होते? ५ उपाय, जळजळ कमी होऊन हातांना मिळेल थंडावा

मिरची चिरल्याने हातांची आग होते? ५ उपाय, जळजळ कमी होऊन हातांना मिळेल थंडावा

Highlightsहे काही उपाय करून बघा. हे उपाय जळजळ कमी करून हातांना थंडावा देण्यासाठी नक्कीच मदत करतील. 

स्वयंपाक करायचा म्हणजे चिरणं, सोलणं, तळणं, भाजणं अशा सगळ्या क्रिया आल्याच... करून करूनच या सगळ्या गोष्टींचा सराव होतो, हे अगदी खरं असलं तरी काही गोष्टींचा त्रास नेहमी होतोच.. उदा. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणं किंवा खूपच बारीक मिरची चिरायला गेलं की मिरचीच्या तिखटपणाचा स्पर्श हातांना होऊन मग हातांची जळजळ, आग होत राहणं, अशा काही गोष्टींचा त्रास नेहमी होतोच. मिरचीचा तिखटपणा एकदा का हातांना झोंबला की मग पुढचे २- ३ तास काहीच सुचन नाही. बऱ्याचदा तर साबणाने स्वच्छ हात धुवूनही हातांची जळजळ (how to reduce burning sensation due to chili) काही कमी होत नाही. म्हणूनच तर हे काही उपाय (home remedies) करून बघा. हे उपाय जळजळ कमी करून हातांना थंडावा देण्यासाठी नक्कीच मदत करतील. 

 

मिरची चिरल्याने हातांची आग होत असल्यास...
१. हातावर बर्फ चोळा

हा एक सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. हातांची होणारी आग, दाह शांत करण्यासाठी बर्फामुळे मिळणारा गारवा नक्कीच उपयुक्त ठरेल. यासाठी बर्फाचा तुकडा हातांवर चोळा. फ्रिजमध्ये नेहमीच बर्फ तयार असेल असे नाही. त्यामुळे अशावेळी फ्रिजमध्ये बराच वेळ ठेवून थंड झालेली कोणतीही वस्तू हातात घट्ट पकडून ठेवा. त्यामुळेही फरक पडेल.

 

२. मध लावा
मधामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल, ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. तसेच त्यात ॲण्टी ऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्वचेची होणारी जळजळ कमी होण्यास फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी अर्धा टेबलस्पून बर्फ हातांवर घ्या आणि चोळून मसाज करा.

 

३. दूध, दही किंवा साय
या तिन्ही गोष्टी थंड प्रकृतीच्या असल्याने या तिन्ही पदार्थांचा उपयोग हातांची आग कमी करण्यासाठी होऊ शकतो. या तिन्ही पदार्थांमध्ये नॅचरल कुलिंग एजंट असतात, असे मानले जाते. त्यामुळे या तिन्हीपैकी जो पदार्थ मिळेल, त्याने हातांना मसाज करा. 

 

४. लिंबू चोळा
हा उपाय ऐकून कदाचित आश्चर्य वाटू शकते. पण जळजळ शांत करण्यासाठी लिंबूदेखील खूप परिणामकारक ठरते. लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी तसेच सायट्रिक ॲसिड त्वचेला थंडावा देण्यासाठी मदत करते. 


५. कोरफड
कोरफडीचा गर किंवा मग घरात उपलब्ध असणारे एखादे ॲलोव्हेरा जेल हातांवर चोळल्यानेही हातांची आग कमी होईल. 

 

Web Title: Home Remedies: Burning hands due to chili? How to reduce irritation of palm due to chopping mirch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.