Join us  

किचनमध्ये सतत मुंग्यांच्या रांगा लागतात? घरात ५ गोष्टी ठेवा, २ मिनिटांत गायब होतील मुंग्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 7:49 PM

Home Remedies For Black And Red Ants (Home Hacks) :  मुंग्यांना दूर पळवण्यासाठीतुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

घरात फिरणाऱ्या मुंग्या कोणत्याही संकटापेक्षा कमी नसतात. (Home Hacks) जरा अन्नाचे कण खाली पडलेले दिसले की लगेच मुंग्याच्या रांगा लागायला सुरूवात होते. (Ants Removal Tips)अनेकदा मुंग्या साखरेच्या डब्यात शिरतात तर कधी गोड पदार्थांभोवती असतात.  मुंग्यांना दूर पळवण्यासाठीतुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जे तुम्हाला नेहमीच कामात येतील. हे सोपे उपाय केल्यास मुंग्या वारंवार घरात शिरणार नाहीत. समजून घेऊया मुंग्यांना पळवण्याचे उपाय कसे करतात. (Home Remedies For Black And Red Ants)

1) लिंबू

मुंग्यापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू परिणामकारक ठरतो. याचा वापर करण्यासाठी लिंबाचे साल ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे ठेवा. मुंग्या लिंबाच्या सुगंधाने दूर पळू लागतील. लिंबाचा रसही तुम्ही मुंग्यांवर शिंपडू शकता. काही आंबट पदार्थ मुंग्याना अजिबात आवडत नाहीत. 

2)  खडू

फळयावर लिहिण्यासाठी वापरला जाणारा  खडू मुंग्यांना पळवण्यासाठी उत्तम ठरतो. ज्या ज्या ठिकाणी मुंग्या फिरतात अशा ठिकाणी खडू फिरवा.  खासकरून अशा ठिकाणी गोल बनवा. या सर्कलमधून मुंग्या बाहेर येणार नाहीत.

कोण आहे जसप्रीत बुबराहची पत्नी संजना गणेशन; ती काय करते, ब्युटी विथ ब्रेन असं का म्हणतात, पाहा

3) काळी मिरी

मुंग्यांना काळी मिरी अजिबात आवडत नाही. काळी मिरी शिंपडल्याने मुंग्या दूर होतात. यासाठी घराच्या कोपऱ्यात जिथे मुंग्या दिसतात तिथे  काळी मिरी पावडर शिंपडा. वाटलेली लाल मिरची घालू शकता. ज्यामुळे मुंग्या लवकर मरतील आणि पळतील आणि पुन्हा येणार नाही.

4) व्हिनेगर

घरात लाल मुंग्या असतील तर काळ्या मुंग्या त्यांना पळवण्यासाठी व्हाईट व्हिनेगर उत्तम उपाय आहे. एका स्प्रे बॉटलमध्ये भरून मुंग्यावर शिंपडा.  घरातील दरवाजे, खिडक्या, फरशीवर तुम्ही व्हाईट व्हिनेगर लावू शकता. ज्यामुळे मुंग्या येणार नाहीत. 

दातांवर पिवळा थर आलाय? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

5) पुदिना

ऊन्हाळा असो किंवा पावसाळा पुदिन्याचा वापर सर्वांच्याच घरी केला जातो. पुदिन्याचा वापर करून तुम्ही मुंग्यांना दूर पळवू शकता. यापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याची पानं वापरा. पुदिन्याच्या पानांचा सुगंध मुंग्यांना सहन होत नाही. ज्यामुळे मुंग्या लांब पळू लागतात. पुदिन्याचे पाणी  उकळून याचे थेंब इसेंशियल ऑईलचे थेंब आणि १ कप पाण्यात मिसळून मुंग्यांवर फवारा. यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळेल.

टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्स