स्वयंपाक घरातलं सिंक ही अगदी प्रत्येक घरातली अत्यावश्यक गोष्ट. रोजच्या रोज त्यात भाज्या, फळे, खरकटे हात, खरकटी भांडी धुतली जातात. त्यामुळे मग कधी कधी त्याच्या पाईपमध्ये अन्नपदार्थांचे कण अडकतात. ते व्यवस्थित वाहून गेले नाहीत, तर मग ते कुजतात आणि त्यांची दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधी येणारं सिंक असेल तर स्वयंपाक घरात उभं राहणं आणि तिथे स्वयंपाक करणं अगदीच अस्वच्छ वाटतं (Home Remedies For Removing Odour From Sink). म्हणूनच असं तुमच्याही सिंकबाबत होत असेल तर हे काही घरगुती उपाय पाहून घ्या. यामुळे सिंकमधली दुर्गंधी निघून जाईल आणि ते स्वच्छ होईल. (How to reduce bad smell from sink and basin)
सिंकमधली दुर्गंधी घालविण्यासाठी उपाय
१. गरम पाणी
गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी साधारण दोन ते तीन लीटर पाणी चांगलं तापवून घ्या. उकळवून घेतलं तरी चालेल. यानंतर हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता.
पुन्हा एकदा "हम आपके है कौन"ची 'निशा' बनून आली माधुरी दीक्षित, कारण होतं खास...
यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणे कमी होईल. दिवसातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा.
२. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचं कॉम्बिनेशनही सिंकमधला दुर्गंध घालविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. यासाठी सगळ्यात आधी सिंकमध्ये अर्धी वाटी बेकिंग सोडा टाका. त्यावर साधारण १ कप व्हिनेगर टाका. यानंतर एखाद्या मिनिटाने त्यावरून २ ते ३ ग्लास उकळतं पाणी सोडा. हा उपायही दिवसातून दोन वेळा करा. घाण वास येणार नाही.
पोह्यांवर लिंबू का पिळावं? बघा शास्त्रीय कारण- कोणते पदार्थ कशासोबत खावे याचे सुपर कॉम्बिनेशन्स...
३. डांबर गोळ्या
वर सांगितलेले २ उपाय तर कराच, पण त्यासोबतच सिंकमध्ये ३ ते ४ डांबर गोळ्या टाकून ठेवा. डांबर गोळ्या दुर्गंध शोषून घ्यायला मदत करतात.