Join us  

मिरची कापल्यानंतर हातांची खूप आग होते? ४ टिप्स वापरा, हात अजिबात जळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 3:11 PM

Home Remedies to Get rid of Hands Burning : मिरची कापल्यानंतर जळजळ होऊ नये यासाठी काही सोपे उपाय पाहूया.

किचनमध्ये स्वयंपाक करताना अनेकदा मिरची कापावी लागते. (While cooking in kitchen) मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ होते. साबणानं स्वच्छ  हात धुवूनही जळजळ कमी होत नाही. (After cutting chili)  चुकून जर त्याच हातांनी डोळ्यांना स्पर्श केला किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर स्पर्श झाला तर खूप आग होते. मिरची कापल्यानंतर जळजळ होऊ नये यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (Home remedies to get rid of hands burning)

पीठ मळू शकता

मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ होत असेल तर तुम्ही पीठ मळू शकता. पीठ मळताना ५ ते ७ मिनिटात तुमचे हात त्या कामात व्यस्त असतील. त्यामुळे हातांची जळजळ दूर होईल.

एलोवेरा जेल लावा

मिरची कापल्यानंतर हाताला जाणवणारी जळजळ दूर करण्यासाठी एलोवेरा जेल लावा. ४ ते ५ मिनिटं हातांना मसाज करा. त्यानंतर हातांची  जळजळ दूर होण्यास मदत होईल.

थंड तेल लावू शकता

जेवण बनवताना मिरची कापताना हातांची जळजळ होत असेल तर थंड तेल हातावर लावा यामुळे जळजळ कमी होईल. 

दही

मिरची कापल्यामुळे हातांची जळजळ होत असेल तर दह्याचा वापर करू शकता. थंड दही  लावून ५ मिनिटांपर्यंत मसाज करा. यामुळे हातांची जळजळ थांबेल. मिरची कापण्यापूर्वी प्लास्टीकचे हँण्ड ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. जेणेकरून हाताला जळजळ होण्याची समस्या टाळता येईल 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न