पावसाळ्यात घरात माशा, झुरळ, डास अशा किटकांचे प्रमाण जसे वाढते तसेच पालींचाही सुळसुळाट व्हायला लागतो. सुरुवातीला एखादी पाल घरात फिरताना दिसते. पण त्यानंतर मात्र तिची अनेक छोटी छोटी पिल्लं घरात वळवळ करायला लागतात. स्वयंपाक घरात तर जरा जास्तच फिरतात. स्वयंपाक घरात पाल दिसली की खरोखरच किळस वाटते. शिवाय पालीचे स्वयंपाक घरात फिरणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही वाईटच. म्हणूनच पावसाळ्यात पालींचा सुळसुळाट टाळायचा असेल आणि पालीला घरातून हाकलून लावायची असेल, तर हा एक सोपा उपाय करून बघा. (best solution to vanish chipkali- paal from house)
vardanpakwan या इन्स्टाग्राम पेजवर हा उपाय सुचविण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त २ गोष्टी लागणार आहेत. त्यातली पाहिली गोष्ट म्हणजे कांद्याची टरफलं. जेव्हा आपण स्वयंपाक घरात कांदा वापरतो, तेव्हा कांद्याची टरफलं काढून ती फेकून देतो.
१०० रुपयांतही मिळू शकतात ब्रॅण्डेड कॉस्मेटिक्स, घ्या यादी, बघा कशी करायची स्मार्ट खरेदी
अशा टाकाऊ टरफलांचा उपयोग करूनच आपल्याला पालींना पळवून लावणारे औषध तयार करायचे आहे. हे औषध तयार करण्यासाठी लागणारा दुसरा पदार्थ म्हणजे टुथपेस्ट. आता कांद्याची टरफलं आणि टुथपेस्ट याच्या मदतीने पालींचा बंदोबस्त करणारे औषध कसे तयार करायचे आणि त्याचा कसा वापर करायचा, ते पाहूया...
पालींना पळवून लावणारे घरगुती औषध१. हे औषध तयार करण्यासाठी कांद्याची टरफलं एका पातेल्यात जमा करा. ती टरफलं व्यवस्थित बुडतील एवढं पाणी पातेल्यात टाका. आता हे पाणी गॅसवर तापवायला ठेवा. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा.
करिना कपूरचा २१ हजारांचा पान पट्टी सलवार कुर्ता!! हा कोणता प्रकार आणि काय त्याची खासियत?
२. त्यानंतर हे कांद्याचं पाणी गाळून घ्या. आता गाळून घेतलेलं पाणी जर १ वाटी असेल तर त्या पाण्यामध्ये १ टीस्पून टुथपेस्ट टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
३. हे पाणी आता स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि अडगळीच्या ठिकाणी किंवा पाल जिथे जास्त वेळा दिसते अशा ठिकाणी दररोज एकदा तरी शिंपडा. काही दिवसांतच घरात पालीचे फिरणे बंद होऊन जाईल.